Pahalgam Terror Attack : ‘दहशतवाद्यांचे कट कधीही यशस्वी होणार नाहीत’; पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची खास पोस्ट

भारत दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही, असा ठाम संदेश पंतप्रधान मोदी यांनी दिला आहे.
Pahalgam Terror Attack : ‘दहशतवाद्यांचे कट कधीही यशस्वी होणार नाहीत’; पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची खास पोस्ट

नवी दिल्ली: 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. हल्ल्याच्या वर्षश्रद्धांजलीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर भावनिक पोस्ट करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, “गेल्या वर्षी आजच्या दिवशी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या निष्पाप नागरिकांना आम्ही स्मरण करत आहोत. ते कधीही विसरले जाणार नाहीत. या दुःखातून सावरणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत.”

पंतप्रधानांनी पुढे म्हटले की, “एक राष्ट्र म्हणून आपण सर्वजण दुःखात आणि निर्धारात एकत्र आहोत. भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतीपुढे कधीही झुकणार नाही. दहशतवाद्यांचे घातकी कट कधीही यशस्वी होणार नाहीत.”

हेही वाचा: Rohit Pawar: ‘मी महायुतीचा नाही, अजितदादांसाठी आणि सुनेत्रा काकींसाठी प्रचार केला’; रोहित पवार यांनी स्पष्टच सांगितलं

गेल्या वर्षी झालेल्या या हल्ल्यानंतर पहलगाम परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. सुरक्षा यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात कारवाई करत दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली होती. आता वर्षभरानंतर परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली असली, तरी त्या हल्ल्याच्या जखमा आजही अनेक कुटुंबांच्या मनात ताज्याच आहेत.

पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरातून शोकभावना व्यक्त केल्या जात असून, दहशतवादाविरोधातील लढा अधिक मजबूत करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. 

हेही वाचा: Gold Silver Rate Today : ग्राहकांची चिंता वाढली, सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी; जाणून घ्या आजचे दर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version