शनिवारी दुपारी कोलकाता येथील साल्ट लेक स्टेडियमवर अर्जेंटिनाचा फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सीच्या सत्कार समारंभात मोठा गोंधळ झाला. फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला पाहण्यासाठी त्याचे हजारो चाहते येथे जमले होते, परंतु मेस्सीची एक झलकही त्यांना पाहता आली नाही तेव्हा गोंधळ झाला.
संतप्त चाहत्यांनी स्टेडियममध्ये खुर्च्या आणि बाटल्या फेकत मोठा गोंधळ घातला. काही चाहत्यांनी दावा केला की त्यांनी मेस्सीला पाहण्यासाठी ५,००० रूपये ते २५,००० रूपयेपर्यंतची तिकिटे खरेदी केली होती, परंतु तरीही, त्यांना त्याची एक झलक पाहता आली नाही. दरम्यान, कार्यक्रमाचे आयोजक सताद्रु दत्ता यांना ताब्यात घेतल्याची बातमी आहे.
हेही वाचा – Lionel Messi चं भारतात जंगी स्वागत; मुंबईतही येणार फुटबॉल आयकॉन
सतद्रु दत्ता यांच्याविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. अतिरिक्त महासंचालक (एडीजी) कायदा आणि सुव्यवस्था जावेद शमीम यांनी सांगितले की, सतद्रु दत्ता यांना अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था जावेद शमीम म्हणाले की, परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
हेही वाचा – Sunil Gavaskar: मोठा निर्णय! सुनील गावस्कर यांच्याबाबत बनावट कंटेंट हटवण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश
कायदा आणि सुव्यवस्थेचे अतिरिक्त महासंचालक जावेद शमीम म्हणाले की परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि प्रकरणाची चौकशी केली जात आहे. त्यांनी असेही सांगितले की एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यांनी जबाबदार असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आश्वासन दिले. महासंचालकांनी प्रेक्षकांना त्यांच्या तिकिटांचे पैसे परत करावेत अशी टिप्पणी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.