देशभरात सध्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीचं प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणाची व्याप्ती दिवसागणिक वाढत आहे. याप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर यांसह देशभरातील तब्बल 49 ठिकाणी छापे टाकले आहेत.
या कारवाई दरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने आणखी दोघांना अटक केली असून, एकूण अटक आरोपींची संख्या आता 13 वर पोहोचली आहे.
हेही वाचा – Raj Thackeray Post: 'त्यांना नक्की कोणते सावरकर कळलेत?'; राज ठाकरेंचा थेट सवाल, कोणावर साधला निशाणा?
त्यामुळे आता भविष्यात अशा कोणत्याही घटना घडू नयेत यासाठी केंद्र सरकार मोठी पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत. परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका फुटू नयेत यासाठी लष्कराकडे गुप्तता आणि सुरक्षेची जबाबदारी सोपवण्याबाबत सरकारकडून गंभीर विचार सुरू आहे.
भविष्यात असा कोणताही दगाफटका टाळण्यासाठी आणि परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आता थेट भारतीय लष्कराची मदत घेण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता तरी देशातील महत्त्वाच्या परीक्षा सुरळीत पार पडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.