IAF aircraft crash Assam : दुःखद बातमी! आसाममधील हवाई दलाच्या विमान अपघातात पायलटसह 5 जवान हुतात्मे; सह-वैमानिक गंभीर

आसाममधील जोरहाट येथील हवाई तळावर उतरताना भारतीय हवाई दलाच्या 'एएन-32' या मालवाहू विमानाला अपघात झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला.
IAF aircraft crash Assam : दुःखद बातमी! आसाममधील हवाई दलाच्या विमान अपघातात पायलटसह 5 जवान हुतात्मे; सह-वैमानिक गंभीर

आसाम : आसाममधील जोरहाट येथील हवाई तळावर उतरताना शनिवारी भारतीय हवाई दलाच्या 'एएन-32' (AN-32) या मालवाहू विमानाला अपघात झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात सुदैवाने सह-वैमानिक (को-पायलट) बचावले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही घटना जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर घडली. भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी एका अद्ययावत निवेदनात या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे (चौकशी समितीचे) आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

विमान अपघातात प्राण गमावलेले पाच जवान –

स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग

फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार

सार्जंट जितेंद्र शर्मा

अग्निवीरवायू खेमाराम कुमावत

अग्निवीरवायू दानिश आलम

हेही वाचा : IAF aircraft crash Assam: आसाममधील जोरहाट विमानतळावर भारतीय वायू दलाच्या विमानाला लँडिंगवेळी अपघात; अचानकपणे उडाला भडका

भारतीय वायुसेनेने म्हटले आहे की, ते या दुर्दैवी घटनेत प्राण गमावलेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतात. दुःखाच्या या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हवाई तळाच्या आवारात लँडिंग केल्यानंतर विमानाला आग लागली. या घटनेनंतर अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. यापूर्वी, भारतीय हवाई दलाने म्हटले होते की, "आज भारतीय हवाई दलाच्या एएन-32 (AN-32) विमानाला अपघात झाला. अधिक तपशील उपलब्ध होताच पुढील माहिती दिली जाईल." भारतीय हवाई दलाने दुजोरा दिला की, या अपघातात विमानात असलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला. सह-वैमानिक बचावला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अपघातानंतर हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तातडीने बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version