‘मी महाराजांचा वंश, गडावर काहीही चुकीचे होऊ देणार नाही’ – छत्रपती संभाजीराजे

‘मी महाराजांचा वंश, गडावर काहीही चुकीचे होऊ देणार नाही’ – छत्रपती संभाजीराजे

राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या ६ डिसेंबर रोजी  रायगड किल्ल्यावर येणार आहेत. तसेच दुसरीकडे रायगड किल्ल्यावर हेलिपॅड बांधण्यात शिवसैनिकांनी विरोध दर्शविला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे..

किल्ले रायगडावर राष्ट्रपती येणार असल्याचा आनंद वेगळाच असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. तसेच मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे. गडावर काहीही चुकीचे घडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रायगडावर हेलिपॅड बनवण्यास शिवसैनिकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद कसे येणार याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी माहिती दिली आहे. राष्ट्रपती रोपवेने रायगडावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विट केले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर रोपवेने येणार आहेत. राष्ट्रपती महोदयांच्या या शिवभक्तीस मी सल्यूट करतो.’

तसेच रायगडावरील रोप वे सक्षम नसल्यामुळे गडावर हेलिकॅप्टर उतरावे आहे. तसेच रोपवे सक्षम नसल्याचा दाखलाही महाराष्ट्र सरकारने दिला आहे. त्यामुळे गडावरील होळीच्या माळावर महाराज्यंच्या पुतळ्यावर धुळ उडणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version