Donald Trump: अमेरिकेचा भारतावर नवा टॅरिफ प्रहार? ट्रम्प प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

स्वस्त आयातीमुळे अमेरिकन शेतकऱ्यांना स्पर्धा कठीण होत असल्याचे त्यांनी म्हटले असून व्यापार करार अंतिम न झाल्याने दोन्ही देशांतील तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Donald Trump: अमेरिकेचा भारतावर नवा टॅरिफ प्रहार? ट्रम्प प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतातून येणाऱ्या काही कृषी उत्पादनांवर, विशेषतः तांदळावर, नव्याने आयात शुल्क लावण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे भारत आणि कॅनडासोबतचा व्यापार करार अद्याप अंतिम न झाल्यामुळे चर्चा आणखी लांबणार असल्याचे Bloomberg ने वृत्त दिले आहे.

व्हाइट हाऊसमध्ये कृषी सचिव ब्रूक रोलिन्स, शेतकरी प्रतिनिधी आणि कायदेमंडळातील सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले. अमेरिकन शेतकऱ्यांसाठी 12 अब्ज डॉलरच्या मदत पॅकेजची घोषणा करताना त्यांनी सांगितले की, स्वस्त आयातीमुळे स्थानिक उत्पादनांना स्पर्धा करणे कठीण जात आहे. अमेरिकन शेतकऱ्यांनी तक्रार केली की भारत आणि थायलंडसारख्या देशांतून येणारा स्वस्त तांदूळ बाजारातील दर कमी करत आहे.

हेही वाचा: Gunaratna Sadavrat : "राज ठाकरेंच्या नाटकात सयाजी शिंदे कलाकार" राज ठाकरे-सयाजी शिंदे यांच्या भेटीवर सदावर्ते यांची खोचक टिपणी

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले की, “भारतातून अमेरिकेत तांदळाचे डंपिंग होत असल्याची माहिती मिळाली आहे. असे होऊ देता येणार नाही. त्यांनी शुल्क भरलेच पाहिजे.” ट्रम्प यांनी बैठकीत अमेरिकेचे खजिनामंत्री स्कॉट बेसेंट (Scott Bessent) यांना विचारले की भारताला तांदळावर कोणती सवलत आहे का? यावर बेसेंट यांनी स्पष्ट केले की, “नाही, भारताशी केलेला व्यापार करार अद्याप अंतिम झालेला नाही.” त्यावर ट्रम्प यांनी पुन्हा ठामपणे सांगितले, “डंपिंग चालणार नाही. हे रोखलेच पाहिजे.”

याच बैठकीत ट्रम्प यांनी कॅनडातून येणाऱ्या खतांवरही कठोर आयात शुल्क लावण्याचे संकेत दिले. “जर गरज पडली तर कॅनडातून येणाऱ्या खतांवरही मोठे शुल्क लावू. आपल्याकडेही खत उत्पादन वाढवता येईल,” असे ते म्हणाले. यापूर्वीही ट्रम्प प्रशासनाने भारतावर 50 टक्के आयात शुल्क लावले होते, ज्यामध्ये रशियन तेल खरेदी केल्याबद्दल 25 टक्के दंडात्मक शुल्काचा समावेश आहे. या नव्या वक्तव्यांमुळे अमेरिका-भारत व्यापार संबंधांमध्ये पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Priyanka Gandhi Vs PM Narendra Modi : प्रियांका गांधींनी मोदींचे नेहरुंवरील आक्षेप फेटाळले म्हणाल्या, "जेवढ्या दिवसांपासून मोदीजी पंतप्रधान तेवढे दिवस नेहरु…"

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version