सध्या संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू असून नुकतेच यामध्ये ‘वंदे मातरम्’ या गीताला दीडशे वर्षे झाल्यानिमित्त चर्चा संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत भाषण करताना ‘वंदे मातरम्’ गीत आणि त्याच्या स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वावर भाष्य केले. तसेच माजी पंतप्रधान पंडीत नेहरुंवरही त्यांनी टीका केली. तब्बल 10 तास विविध पक्षांच्या खासदारांनी या गीताबद्दलचे आपले विचार मांडले. संगीतकार गायक विशाल दादलानी यांनी मात्र यावर नाराजी दर्शवली असून सरकारवर टीका केली आहे.
बॉलीवुड गायक विशाल ददलानी ने संसद में 8 दिसंबर को ‘वंदे मातरम’ पर हुई 10 घंटे लंबी बहस पर नाराज़गी जताई है।
उन्होंने सोशल मीडिया पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि,
“इस बहस के कारण लगता है जैसे बेरोज़गारी, इंडिगो की समस्या और प्रदूषण (हवा का मुद्दा) सब हल हो गए हैं।”
इस तरह उन्होंने… pic.twitter.com/PfGsL16BhB — Dhruv Rathee Satire (@DhruvRathenx) December 9, 2025
‘वंदे मातरम्’ या गीतावर संसदेत चाललेल्या दहा तासांच्या चर्चेवर विशाल ददलानीनं व्हिडीओ शेअर करत त्याचं मत व्यक्त केलं आहे. विशाल दादलानी म्हणाला की, “नमस्कार! सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपल्या संसदेत १० तास ‘वंदे मातरम्’बद्दल चर्चा झाली. ‘वंदे मातरम्’ हे आपलं देशभक्तीपर गीत आहे, जे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलं आहे. लोक या गीतावर खूप प्रेम करतात. यावर संसदेत १० तास चर्चा झाली. यामुळे भारतातल्या बेरोजगारीची समस्या, इंडिगोची समस्या, वायु प्रदूषणची समस्या दूर झाली आहे. विचार करा… दहा तास एका गीतावर चर्चा झाली. बेरोजगारी, प्रदूषणबद्दल काही बोललं गेलं नाही. पण या चर्चेमुळे या सगळ्या समस्या दूर झाल्या आहेत. ही चर्चा आपल्या टॅक्समधून दिलेल्या पैशांत झाली. संसदेतल्या एका मिनिटासाठी अडीच लाख रुपये खर्च केले जातात. असे दहा तास या चर्चेसाठी खर्च झाले. दहा तास म्हणजे सहाशे मिनिटे… आता विचार करा…”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.