Singer Nisar Wayanad: दुबईत कॉन्सर्टच्या काही तास आधी तब्येत खालावली अन् गायकाचा मृत्यू, इंडस्ट्रीत खळबळ

प्रसिद्ध मल्याळम गायक निसार वायनाड यांचे दुबईत वयाच्या 44 व्या वर्षी अकाली निधन झाले. ते यूएईमध्ये विशेषतः अशा गायकीसाठी लोकप्रिय होते, ज्यात दिग्गज प्लेबॅक गायक उदित नारायण यांच्या आवाजाची झलक ऐकू
Singer Nisar Wayanad: दुबईत कॉन्सर्टच्या काही तास आधी तब्येत खालावली अन् गायकाचा मृत्यू, इंडस्ट्रीत खळबळ

प्रसिद्ध मल्याळम गायक निसार वायनाड यांचे दुबईत वयाच्या 44 व्या वर्षी अकाली निधन झाले. ते यूएईमध्ये विशेषतः अशा गायकीसाठी लोकप्रिय होते, ज्यात दिग्गज प्लेबॅक गायक उदित नारायण यांच्या आवाजाची झलक ऐकू येत असे. निसार नियमितपणे दुबई आणि यूएईतील इतर शहरांमध्ये होणाऱ्या संगीत कार्यक्रमांमध्ये आणि सामुदायिक कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करत असत. त्यांच्या निधनाच्या बातमीने तिथे राहणाऱ्या मल्याळी समाजात शोककळा पसरली आहे.

सर्वात भावुक करणारी गोष्ट म्हणजे ज्या दिवशी त्यांचे निधन झाले, त्याच दिवशी त्यांना अजमानमध्ये एका संगीत कार्यक्रमात सादरीकरण करायचे होते. पण त्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. कॉन्सर्टपूर्वी त्यांना दुपारी तीव्र ताप आला होता. तब्येत बिघडल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. रिपोर्टनुसार त्यांच्या डेथ नोटिफिकेशनमध्ये मृत्यूचे कारण अॅसिडोसिस (जेव्हा शरीरातील द्रव आणि रक्तात अॅसिडची मात्रा खूप वाढते आणि पीएच पातळी सामान्यपेक्षा कमी होते, नोंदवले गेले आहे.

हेही वाचा –  Abhinay Berde: 'ती सध्या काय करते' फेम कलाकार अभिनय क्षेत्रातून घेतोय ब्रेक, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती, चाहत्यांना धक्का

निसार यांच्या अचानक निधनाने त्यांचे कुटुंब, मित्र आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. निसार वायनाड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. निसार हे मप्पिलापट्टू गायक म्हणून ओळखले जात असे. ही केरळच्या मालाबार प्रदेशातील पारंपरिक संगीत शैलीशी संबंधित एक महत्त्वाची विधा आहे. मात्र, त्यांचा संगीत प्रवास फक्त या शैलीपुरता मर्यादित राहिला नाही. ते विविध प्रकारची गीते आपल्या आवाजात सादर करत असत आणि विशेषतः हिंदी चित्रपटांच्या गाण्यांच्या त्यांच्या सादरीकरणांना लोकप्रियता मिळाली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version