Nana Patekar : नाना पाटेकर यांनी उद्विग्न होऊन व्यक्त केली महाराष्ट्र सोडण्याची भावना; हे ऐकून केंद्रीय मंत्र्यांसह सारेच चक्रावले, नेमकं काय घडलं?

 नागपूरमध्ये नुकतेच जलक्रांती परिषद घेण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
Nana Patekar : नाना पाटेकर यांनी उद्विग्न होऊन व्यक्त केली महाराष्ट्र सोडण्याची भावना; हे ऐकून केंद्रीय मंत्र्यांसह सारेच चक्रावले, नेमकं काय घडलं?

नागपूर : मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाऊंडेशनसह अनेक सामाजिक कार्यात योगदाने देणारे कलाकार नाना पाटेकर यांनी नुकतेच एका कार्यक्रमात महाराष्ट्र सोडण्याची भावना व्यक्त केली. नागपूरमध्ये नुकतेच जलक्रांती परिषद घेण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र सोडण्याचे विधान करून उपस्थितांचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, “मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो. डोंगर खेड्यात काही करता येईल का? तिथेच आपले चार खांदे शोधावे आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावे, असा विचार मनात येतोय,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्यांच्या विधानाने सारेच चक्रावले. 

हेही वाचा : NCP Internal Conflict: पटेल-तटकरेंची नाराजी दूर होणार? राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावर पडदा टाकण्यासाठी सुनेत्रा पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अभिनयासोबतच नाना पाटेकर विविध सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यासोबत 2015 साली त्यांनी नाम फाऊंडेशनची स्थापना केली. या माध्यमातून महाराष्ट्रातील भीषण पाणीप्रश्नावर त्यांनी कार्य सुरू केले. या कार्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात यशही आहे. मकरंद अनासपुरे आणि स्वतःच्या सुरुवातीच्या प्रयत्नांची आठवण सांगताना ते म्हणाले की, “माणूस म्हणून आपले काही कर्तव्य आहे, याच भावनेतून मी सुरुवातीला दीड कोटी रुपये जमा केले आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 15 हजार रुपये देण्यास सांगितले. पण जेव्हा आम्ही ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली, तेव्हा अवघ्या 3 महिन्यांत जनतेने 60 कोटी रुपयांची मदत दिली. हा महाराष्ट्राच्या दातृत्वाचा आणि विश्वासाचा मोठा पुरावा आहे.”

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version