‘ईडी’कडून ललित गोयल यांना अटक

‘ईडी’कडून ललित गोयल यांना अटक

  मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने भाजप नेते सुधांशु मित्तल यांचा मेव्हणा आणि आयआरईओ ग्रुपचा अध्यक्ष ललित गोयल यांना अटक केली आहे. सोमवारी ललित गोयल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर मंगळवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले. आणि आज झालेल्या चौकशीत ललित गोयल यांना अटक करण्यात आली आहे.

  मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा २००२ या कायद्यांतर्गत ललित गोयल यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. २०१०मध्ये गुंतवणूकदारांच्या ७ कोटी ३० लाख अमेरिकन डॉलर वेगवेगळ्या ट्रस्टमध्ये अफरातफर केल्याचा आरोप ललित गोयल यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे अटक होण्याच्या भीतीने अमेरिकेला पळून जाण्याच्या बेतात असताना अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने तपास सुरू केला असून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने भाजप नेते सुधांशु मित्तल यांचा मेव्हणा आणि आयआरईओ ग्रुपचा अध्यक्ष ललित गोयल यांना अटक केली आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version