वकील गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात

वकील गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. याप्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुणरत्न सदावर्ते यांना कोणतीही पूर्व नोटीस न देता त्यांना चौकशीसाठी पोलीस स्थानकात नेत असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता त्यांना याप्रकरणी अटक होण्याची शक्यता जोर धरत आहे.

दरम्यान, चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले आहे. तसेच माझी हत्या होऊ शकते, असेही सदावर्ते यांनी सांगितले आहे.

आज संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी धडक मोर्चा काढला. यावेळी कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत आंदोलन केले. तर कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सिल्वर ओकवर हल्ला केल्याप्रकरणी हल्लेखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून १०७ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झाला असून या कारवाईत महिला हल्लेखोरांचा समावेश जास्त असल्याची माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version