Sonakshi Sinha : सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवताचं भडकली सोनाक्षी सिन्हा; म्हणाली ‘प्रत्येक नागरिकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार…’

Sonakshi Sinha : सोनम वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवताचं भडकली सोनाक्षी सिन्हा; म्हणाली ‘प्रत्येक नागरिकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार…’

मुंबई : लडाखला विशेष दर्जा मिळण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना प्रशासनाने आंदोलनस्थळावरून जबरदस्तीने हटवून रुग्णालयात दाखल केले. या कारवाईवरून आता मोठे वादळ निर्माण झाले असून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेदेखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सोनाक्षीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आपले मत मांडले आहे. 

हेही वाचा : sonam wangchuk : सोनम वांगचुक यांच्या तब्येतीबाबत हॉस्पिटलमधून आली मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिला किडनीला धोक्याचा इशारा

काय म्हणाली सोनाली सिन्हा – 

आज जे सोनम सरांसोबत झाले. ठीक नाही झालं. याचा दिलासा की त्यांची तब्येत बरी आहे. त्यांची पत्नी त्यांच्या सोबत आहे. ते अजूनही खंबीर आहेत, जागृक आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या हजारो लोकांना बघत आहे. जे काही त्यांच्यासोबत होतयं. ते एकदम शांत, संयमी आणि अहिंसापूर्वक त्यांचं म्हणणं समोर मांडत आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की, देशाचं उज्वल भविष्य ही आपली युवा शक्ती आहे. या सर्वांना पाहून ही बाब अजूनच खरी वाटते. इतका त्रास, इतकं नैराश्य, इतक्या प्रतिक्षेनंतरही ज्याप्रकारे तुम्ही तुमचा संघर्ष शांतीपूर्ण आणि सन्मानाने सुरू ठेवला आहे. त्याला सलाम. २० तारखेला जे कोणी आंदोलनात सहभागी होतं आहेत. त्या सर्वांना माझी फक्त एकच विनंती आहे. आपला आवाज बुलंद ठेवा. पंरतू आपला मार्ग तोच असू द्या, जो आतापर्यंत आपल्या आंदोलनाची सर्वात मोठी ताकद राहिला आहे. शांती, एकता, सन्मान, बस्स. प्रत्येक नागरिकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. जेव्हा लोकं अहिंसेच्या मार्गाने फक्त आशा आणि विश्वास ठेवून चालत राहतात, तेव्हा त्यांचा आवाज अजूनच मजबूत होतो. तुम्ही सर्व, जे सोनम सरांसोबत जोडले गेलेले आहात. तुम्ही आम्हाला आठवण करून दिली की, हिंमत नेहमी गोंगाट करण्याने नाही, कधी कधी शांततापूर्व, निश्चयाने उभे राहण्यात असते. मी युवांसोबत आहे. विद्यार्थ्यांसोबत आहे. आपल्या संविधानासोबत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या देशासोबत आहे. जसं प्रश्न विचारणं आपला अधिकार आहे, आशा ठेवणंदेखील आपला हक्क आहे. त्यामुळे इतकीच आशा आहे की, 20 तारखेला संवादाचा मार्ग खुला होईल, एकमेकांचं ऐकलं जाईल. आणि प्रत्येकाला आवाजाला तो सन्मान मिळेलं, ज्याचा त्यांना हक्क आहे. मी तुमच्या सोबत आहे. ऑल दि बेस्ट. जय हिंद!

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version