अनेक ठिकाणी लग्नसराई सुरु झाली आहे. लग्न म्हटलं की, त्यात वर-वधू, वरात अन् धुमाकूळ हा असतोच. अनेक वेळा लग्नसंमारंभात छोट्या मोठ्या कुरमोडी होतातचं पण त्या क्षणार्धात सोडवल्या देखील जातात. अशातच उत्तर प्रदेशातील अलिगड येथे एक अजबचं प्रकार घडला आहे. वधू सजली होती वर देखील वऱ्हाडासह दारासमोर होता, सर्व काही सुरळीत सुरु होत अन् अचानक असं काही घडलं की, वधूने वरासोबत जाण्यास नकार दिला.
उत्तर प्रदेशातील अलिगड येथे लग्नसंमारंभ सुरु असताना तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांमध्ये अचानक वाद निर्माण झाला. हा वाद इतका तीव्र झाला की, लग्नाच्या मेजवानीतले काही सदस्य आणि कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांवर प्लेट्स आणि खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली. एवढचं नव्हे तर लाथा आणि मुक्क्यांसह हा वाद हाणामारीपर्यंत पोहचला आणि यामुळे सर्वत्र गोंधळ निर्माण झाला. यात वधूचे वडील देखील जखमी झाले. लग्न समारंभातील सदस्यांच्या कृती पाहून वधू रागात म्हणाली की, "मला माहित नाही की लग्नानंतर हे लोक माझे काय करतील. मी वरासोबत जाणार नाही." ज्यामुळे वराला रिकाम्या हाती लग्नाची मिरवणूक परत माघारी फिरवावी लागली.
घडलेल्या प्रकरणावर वराच्या वडिलांनी आरोप करत म्हटलं की, वधूच्या बाजूने कोणीतरी लग्नाच्या मिरवणुकीत एका मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे हा वाद निर्माण झाला. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, दोन्ही कुटुंबांमध्ये कोणताही संघर्ष नव्हता. बाहेरच्या लोकांनी यात हस्तक्षेप करून वातावरण बिघडवले. तसेच पुढे वधूने यावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, "आमच्याकडून काहीही चुकीचे घडले नाही. भांडण का झाले हे आम्हाला माहित नाही."
दरम्यान घडलेल्या प्रकरणाची माहिती मिळताच रोरावार पोलिस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी शांतता भंग केल्याबद्दल कलम १५१ सीआरपीसी अंतर्गत वधूच्या बाजूने एक आणि वराच्या बाजूने तिघांवर कारवाई करण्यात आली आहे.सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांसह पोलिस सखोल तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.