Palghar News : पालघरमध्ये खळबळ! लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू; कुटुंबीयांचे आरोप काय?

पालघरमधील मोखाडा तालुक्यातील घानवळ येथे जन्मानंतर दिल्या जाणाऱ्या ओरल पोलिओ आणि पेंटाव्हॅलेंट लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर, अवघ्या काही तासांत दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Palghar News : पालघरमध्ये खळबळ! लसीकरणानंतर दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू; कुटुंबीयांचे आरोप काय?

पालघरमधील मोखाडा तालुक्यातील घानवळ येथे जन्मानंतर दिल्या जाणाऱ्या ओरल पोलिओ आणि पेंटाव्हॅलेंट लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर, अवघ्या काही तासांत दोन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांकडून चौकशीची मागणी करण्यात येत आहे.

हेही वाचा- Raigad Ambenali Ghat Accident: रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात! तब्बल 500 फुट खोल दरीत कोसळली स्कॉर्पिओ; दुर्घटनेचं नेमकं कारण काय?

घानवळ येथील निलेश घाटाळ आणि निकिता घाटाळ या दांपत्याच्या दोन महिन्यांच्या बालकाला जव्हार कुटीर रुग्णालयात ओरल पोलिओ आणि पेंटाव्हॅलेंट लसीचा दुसरा डोस देण्यात आला होता. लसीकरणापूर्वी बालक पूर्णपणे सुदृढ असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र लस दिल्यानंतर काही तासांतच बालकाला प्रचंड ताप येऊन बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

बाळाची तब्येत उत्तम असतानाही डोस दिल्यानंतर हा प्रकार घडल्याने, डोसच्या ‘साईड इफेक्ट’मुळेच बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता मृत बाळाच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version