मुंबई : लोकल गाडीत 22 वर्षीय तरुणावर चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर मुंबई पोलिसांनी कुर्ला येथून अटक केली आहे. रोशन सुवर्ण असे या आरोपीचे नाव असून या प्रकरणी मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलीस मिळून अधिक तपास करत आहेत. मंगळवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास मुंबई लोकलमध्ये ही धक्कादायक घटना घडली. अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान रात्री 10 वाजताच्या सुमारास एका क्षुल्लक कारणावरून मयंक लोहार याची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. रात्री सुरु असलेल्या मुसळधार पावसादरम्यान लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या वादावरून मयंक लोहार यांचा आरोपीसोबत वाद झाला. जोरदार पाऊस पडत असल्याने लोकलचे दार उघडे असल्यामुळे पावसाच्या सरी थेट आत बसलेल्या प्रवाशांवर देखील पडत होत्या. त्यामुळे त्या डब्यात बसलेल्यांनी दरवाजा बंद करण्यास सांगितला. म्हणून दोन प्रवाशांमध्ये जोरदर वाद झाला. या वादाचे रुपांतर गंभीर हत्येत झाले. या वादादरम्यान संतप्त आरोपीने बॅगेतून चाकू काढून मयंक लोहार याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मयंक लोहारचा मृत्यू झाला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.