Crime News: गर्भवती बहिणीला संपवणारा पती जामिनावर सुटला; मेहुण्याने रस्त्यातच केला गेम

वैष्णवीच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या हरी बाबूवर तिच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळ आणि हत्येचा थेट आरोप केला होता.
Crime News: गर्भवती बहिणीला संपवणारा पती जामिनावर सुटला; मेहुण्याने रस्त्यातच केला गेम

Revenge Killing Crime News: गर्भवती बहिणीच्या झालेल्या निर्घृण हत्येचा बदला घेण्यासाठी एका भावाने सुमारे 6 महिने वाट पाहून तिच्या पतीची भररस्त्यात हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 19 वर्षीय संतोष असे आरोपी भावाचे नाव असून त्याने बहिणीचा पती सी. हरी बाबू याच्यावर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. या हल्ल्यानंतर आरोपीने एक सेल्फी व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करत बहिणीच्या मृत्यूचा बदला घेतल्याचे शेअर करत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची इच्छा व्यक्त केली. वैष्णवीच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या हरी बाबूवर तिच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळ आणि हत्येचा थेट आरोप केला होता.

पाणीपुरीच्या ठेल्याशेजारी घडला भीषण थरार
मृत हरी बाबू मक्याची विक्री करून आपला उदरनिर्वाह करत होता. तो एका पाणीपुरीच्या ठेल्याशेजारी पाणी पीत उभा असताना एका पांढऱ्या कारमधून आलेल्या संतोषने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीने हातात कोयता घेऊन रस्ता ओलांडत थेट हरी बाबूच्या डोक्यावर आणि मानेवर सपासप वार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हरी बाबूचा जागीच मृत्यू झाला तर आरोपी तेथून पसार झाला. हा प्रकार तेलंगणातील निझामाबाद शहरात घडला आहे.

हेही वाचा – Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाला 93 दिवसांनंतर नवे वळण; पुणे पोलिसांकडून न्यायालयात 2 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल

बहिणीच्या हत्येप्रकरणी पतीची अटक आणि जामीन
जगतियाल जिल्ह्यातील माहेरी 17 मार्च रोजी 20 वर्षीय वैष्णवी हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या तिचा पती हरी बाबू याला पोलिसांनी काही दिवसांतच अटक केली होती. मात्र, जुलै महिन्यात त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता. न्यायाची दीर्घकाळ वाट पाहिल्यानंतरही योग्य न्याय न मिळाल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे आरोपी भावाने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. आता हरी बाबूच्या हत्येनंतर निझामाबाद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीच्या व्हायरल व्हिडिओच्या आधारे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

हुंडाबळी, गर्भधारणा आणि सोशल मीडियावरील वाद
या हत्याकांडामागे कौटुंबिक कलह आणि संशयाचे मोठे जाळे असल्याचे तपासात समोर आले आहे. लग्नानंतर सतत होणाऱ्या हुंड्याच्या त्रासाला कंटाळून वैष्णवी माहेरी निघून आली होती. मृत्यूच्या काही तास आधीच तिने सोशल मीडियावर आपण गर्भवती असल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती. वैष्णवीच्या यूट्यूब चॅनेलवर 50 हजारांहून अधिक सब्सक्राइबर्स होते आणि तिच्या या लोकप्रियतेमुळे पती हरी बाबू नाराज होता. मृत्यूपूर्वीच्या रात्री हरी बाबू माहेरी आला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वैष्णवीच्या छातीवर व मानेवर चाकूच्या जखमा आढळल्या होत्या.

हेही वाचा – Crime News : क्षुल्लक वादातून पत्नीला निर्घृणपणे संपवलं; चेहरा विद्रूप करून टोकाचं पाऊल उचलल्याचा बनाव… पण एक चूक अन् डाव पलटला

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version