Tata Motors Cyber Attack : टाटा मोटर्सवर सर्वात मोठा सायबर हल्ला, गुंतवणूकदार टेन्शनमध्ये; कर्मचाऱ्यांचा डेटाही उडाला

टाटा मोटर्सच्या सब्सिडियरी जॅग्वार लॅंड रोव्हर कंपनीवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.
Tata Motors Cyber Attack : टाटा मोटर्सवर सर्वात मोठा सायबर हल्ला, गुंतवणूकदार टेन्शनमध्ये; कर्मचाऱ्यांचा डेटाही उडाला

मुंबई: टाटा मोटर्सच्या सब्सिडियरी जॅग्वार लॅंड रोव्हर कंपनीवर आतापर्यंतचा सर्वात मोठा सायबर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यामुळे, कंपनीला तब्बल 21 हजार कोटी भारतीय रुपयांचं नुकसान सहन करावं लागत आहे. या हल्ल्यानंतर, इंग्लंडमधील जेएलआरच्या वेस्ट मिसलॅंड्स आणि मार्सिसाइज येथील कारखान्यांमधील उत्पादन थांबवण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हॅकर्सनी जॅग्वार लॅंड रोव्हर कंपनीच्या कॉम्पुटरच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये घुसखोरी केली होती. त्यामुळे, कंपनीचे रोजचे उत्पादन विस्खळीत झाले. जॅग्वार लॅंड रोव्हर कंपनी दररोज जवळपास एक हजार वाहनांचं उत्पादन करतो. मात्र, मागील काही आठवड्यांपासून हे उत्पादन ठप्प आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजेस, जॅग्वार लॅंड रोव्हर कंपनीकडे सायबर विमा संरक्षणच नव्हते. जॅग्वार लॅंड रोव्हर कंपनी विमा घेण्याच्या प्रक्रियेत होती, मात्र त्यापूर्वीच हा हल्ला झाला. त्यामुळे, संपूर्ण नुकसान कंपनीलाच सोसावं लागणार आहे. या घटनेचा खुलासा इंडस्ट्री द इंश्योररने केला आहे. 

हेही वाचा: Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठी अपडेट! शिक्षकचं निघाला गद्दार; ऑपरेशन महादेवमध्ये सापडला सुगावा

याआधी, एप्रिलमध्ये सौंदर्य, खाद्य आणि घरगुती उत्पादने विकणारी ब्रिटिश बहुराष्ट्रीय किरकोळ विक्रेता मार्क्स अँड स्पेन्सरवरही अशाच प्रकारे हल्ला झाला होता. मात्र, त्यांच्याकडे विमा असल्यामुळे नुकसान मर्यादित राहिलं, जॅग्वार लॅंड रोव्हर कंपनीच्या बाबतीत ही सुविधा उपलब्ध नसल्याने टाटा मोटर्सवर आर्थिक संकट आले आहे. टाटा मोटर्सच्या एकत्रित उत्पन्नात जॅग्वार लॅंड रोव्हर कंपनीचा वाटा तब्बल 70% आहे. त्यामुळे, या धक्क्याचा परिणार थेट टाटा मोटर्सच्या बॅलन्स शीटवर होणार आहे. या घटनेमुळे, गुंतवणूकदारांमध्येही चिंतेंचे वातावरण आहे. या सायबर हल्ल्याचा फटका इंग्लंडमधील 33 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना बसला आहे. डीलर्सना कार रजिस्ट्रेशन करता येत नाही, स्पेअर पार्ट्स ऑर्डर करणे शक्य नाही. सोबतच, डायग्नोस्टिक सॉफ्टवेअर बंद असल्याने वाहन दुरुस्तीही अवघड झाली आहे. तसेच, या हल्ल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या डेटावरही परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version