Hotel Raid: राजकीय वर्तुळात खळबळ! काँग्रेस नेत्याचे हॉटेलमधील कारस्थान चव्हाट्यावर; पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी

एका हॉटेलवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याला तीन तरुणींसोबत रंगेहाथ पकडण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Hotel Raid: राजकीय वर्तुळात खळबळ! काँग्रेस नेत्याचे हॉटेलमधील कारस्थान चव्हाट्यावर; पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी

Hotel Raid: मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यात एका हॉटेलवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याला तीन तरुणींसोबत रंगेहाथ पकडण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. राजगड जिल्ह्यातील ब्यावरा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राहुल दांगी असे या नेत्याचे नाव असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांची प्राथमिक सदस्यत्वावरून तात्काळ हकालपट्टी केली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत.

बीनागंज येथील हॉटेलवर पोलिसांची धडक कारवाई

चांचौडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीनागंज येथील 'हॉटेल राज पॅलेस'मध्ये अनैतिक व्यवहार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास हॉटेलवर अचानक छापा टाकला. हॉटेलच्या विविध खोल्यांची तपासणी केली असता, तीन तरुण तीन तरुणींसोबत अत्यंत आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून तिन्ही जोडप्यांना ताब्यात घेतले.

काँग्रेस पक्षाकडून तात्काळ पदमुक्तीचा आदेश

या प्रकरणात काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष राहुल दांगी यांचे नाव समोर आल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी आक्रमक पवित्रा घेतला. मध्यप्रदेश काँग्रेस संघटनेचे प्रभारी सरचिटणीस संजय कामले यांनी अधिकृत पत्रक काढून दांगी यांच्या हकालपट्टीची घोषणा केली. प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे सांगत, अशा विकृत आणि असंस्कृत प्रवृत्तीला पक्षात स्थान दिले जाणार नाही, असे काँग्रेस नेतृत्वाने स्पष्ट केले.

'मी फक्त चहा प्यायला थांबलो होतो'; नेत्याचा पोलिसांवर आरोप

कारवाईदरम्यान पोलिसांनी राहुल दांगी, उमाकांत पुरी आणि इंद्र सिंह मेहर या तिघांना ताब्यात घेतले. मात्र, राहुल दांगी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "आम्ही राजस्थानमधील कामखेडा मंदिरातून दर्शन घेऊन परतत होतो. प्रवासादरम्यान हॉटेलमध्ये फक्त चहा पिण्यासाठी थांबलो असताना पोलिसांनी आम्हाला चुकीच्या पद्धतीने यात अडकवले," असा दावा दांगी यांनी केला आहे.

हेही वाचा – Crime News : निळ्या ड्रमपेक्षाही भयानक कांड, पतीवर चाकूने अनेक वार, 13 इंच पोट फाडलं, आतडे बॅगेत भरताना घरमालकाने पाहिलं अन्…

शांतता भंगाखाली कारवाई अन् जामिनावर सुटका

हॉटेलमध्ये सापडलेल्या तिन्ही तरुणी वयाने सज्ञान होत्या आणि त्यांनी कोणाविरुद्धही तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पोलिसांनी तिन्ही युवक, तरुणी आणि हॉटेल व्यवस्थापकाविरुद्ध शांतता भंगाच्या कलमांखाली कारवाई केली. सर्व आरोपींना तहसीलदारांसमोर हजर करण्यात आले असता, तेथून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, या प्रकरणामुळे काँग्रेस पक्षाची मोठी नामुष्की झाली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version