Solapur Crime: सोलापूर हादरलं! धार्मिक शिक्षण देणाऱ्या 53 वर्षीय मौलानाकडून 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग

सोलापुरातील मदरशात 53 वर्षीय मौलाना मोहम्मद उमर रझवी याने 10 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग केला.
Solapur Crime: सोलापूर हादरलं! धार्मिक शिक्षण देणाऱ्या 53 वर्षीय मौलानाकडून 10 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग

सोलापूर शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शहरातील एका मदरशामध्ये धार्मिक शिक्षण देणाऱ्या 53 वर्षीय मौलानाकडून अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या नराधम मौलानाविरुद्ध सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मोहम्मद उमर रझवी (वय 53) असे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या विकृत मौलानाचे नाव आहे. पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद उमर रझवी हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो गेल्या काही काळापासून सोलापूर शहरातील एका स्थानिक मदरशामध्ये लहान मुलांना धार्मिक शिक्षण देण्याचे काम करत होता. ज्या वयात चिमुकलीला सुरक्षित वातावरण मिळणे अपेक्षित होते, त्याच पवित्र मानल्या जाणाऱ्या ठिकाणी 53 वर्षांच्या या नराधमाने तिच्यासोबत अत्यंत लाजिरवाणे कृत्य केले.

हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांनी तत्परतेने पावले उचलत पोलिसांत धाव घेतली. मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी मौलानाविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि विनयभंगाच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई करत आरोपी मोहम्मद उमर रझवी याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आरोपीला कठोरतमा शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version