Transgender Nagarsevak Candidate Death: सोलापूर हादरलं ! तृतीयपंथी नगरसेवकपदाच्या उमेदवाराला संपवलं, धक्कादायक कारण समोर

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मधून अपक्ष म्हणून लढण्याची तयारी करणाऱ्या अय्यूब हुसेन सय्यद यांना संपवण्यात आलं असून, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.<br/>
Transgender Nagarsevak Candidate Death: सोलापूर हादरलं !  तृतीयपंथी नगरसेवकपदाच्या उमेदवाराला संपवलं, धक्कादायक कारण समोर

Transgender Nagarsevak Candidate Death: आपल्या समुदायाचा आवाज महापालिकेत घुमवावा, हे स्वप्न उराशी बाळगून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या एका तृतीयपंथी उमेदवाराचा क्रूर अंत झाला आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मधून अपक्ष म्हणून लढण्याची तयारी करणाऱ्या अय्यूब हुसेन सय्यद यांना संपवण्यात आलं असून, या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

लोकप्रियतेच्या उंबरठ्यावर असताना घात

अय्यूब सय्यद हे उत्तर सदर बझारमधील मुर्गीनाला परिसरात वास्तव्यास होते. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे ते परिसरात अत्यंत लोकप्रिय होते. सरकारी कागदपत्रांची कामे असोत वा गरीबांची मदत, अय्यूब नेहमीच पुढे असायचे. त्यामुळेच लोकांनी त्यांना 'भावी नगरसेवक' म्हणून संबोधण्यास सुरुवात केली होती. मात्र, निवडणूक लढवण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

हेही वाचा – Crime News: ऐकावं ते नवलच! शुल्लक कारणावरून जावयाने थेट सासरवाडीवर चालवला बुलडोझर ; आधी भिंत पाडली आणि मग…

मिळालेल्या माहितीनुसार, अय्यूब यांना सोन्याच्या दागिन्यांची विशेष आवड होती. त्यांच्या अंगावर नेहमीच लाखोंचे दागिने असायचे. हत्या करणाऱ्या नराधमांनी केवळ त्यांचा जीवच घेतला नाही, तर त्यांच्या अंगावरील मौल्यवान दागिनेही लंपास केले आहेत. यावरून हे कृत्य लुटमारीच्या उद्देशातून झालं असावं, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा – Noida Shocker: 10 वीच्या विद्यार्थिनीने 8 व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का

उपेक्षित समाजाचे स्वप्न अधुरे

तृतीयपंथी समाजाला मिळणारी वागणूक आणि त्यांच्या समस्या जवळून अनुभवलेल्या अय्यूब यांचा निश्चय होता की, आपला एक लोकप्रतिनिधी असावा. पांढरे शुभ्र कपडे आणि दागिन्यांनी मढलेले, आत्मविश्वासाने वावरणारे अय्यूब आपल्या समाजासाठी आशेचा किरण बनले होते. मात्र, त्यांच्या हत्येमुळे एका संघर्षाचा अंत झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version