रागाच्या भरात घेतलेला एक निर्णय देखील एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करु शकतो. पती-पत्नीमध्ये वारंवार होणारे वाद, घरातील हिंसाचार आणि त्यातूनच निर्माण होणारा राग अखेर एका भयंकर घटनेत बदलला. जिथं पतीच्या हत्येनंतर पत्नीन केलेल्या कृत्याने अख्ख शहर हादरुन गेलं आहे.
नक्की घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश नावाच्या व्यक्तीच्या हत्या केल्याप्रकरणी त्याच्याच पत्नी विमला हिला पोलिसांनी सध्या अटक केलेली आहे. 21 ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याची माहिती आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत विमलाने आपणच पतीची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा करण्यात आलेला आहे. हत्येनंतर तिने पतीच्या शरीरावरर चाकून वार करत त्याचे काही अवयव ही काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, राजेशला सुरुवातीपासून दारुचे व्यनस होते. तो वारंवार दारुच्या नशेत विमलाला मारहाण करत असे. पतीकडून होत असलेल्या दररोजच्या त्रासाला विमला वैतागली होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे, राजेशला दारुच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी विमलाने याआधी भूतबाधा उतरवण्याचे आणि तंत्र-मंत्राचे हे उपाय केल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. मात्र, त्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
विमला ही सुरुवातीपासून जादूटोण्यावर विश्वास ठेवत असल्याचे पोलिसांना पुढील माहितीत सांगितले. ती देवी कालीची पूजा करत होती. शरीरातून काढलेले अवयव हे देवीला अर्पण करुन काही धार्मिक उद्देश हा साध्य करण्याचा तिचा विचार होता, असा पोलिसांना दावा केला आहे. पती राजेशच्या हत्येनंतर ती तब्बल दोन ते तीने तास मृतदेहाजवळ बसून होती. अतिशय क्रुर गोष्ट म्हणजे, विमलाने राजेशच्या शरीराचे अवयव काढत होती आणि राजेशचे रक्त आपल्या कपाळाला लावत होती. कारण, नवऱ्याचं रक्त कपाळाला लावल्यावर माझ्या मनाला शांती मिळाली, असं विमाला म्हणाली.
प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट
पीडित पती राजेश आणि आरोपी पत्नी विमला यांचा साधारण दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना एकही मूलबाळ नव्हते. विशेष म्हणजे राजेशचे हे तीसरे लग्न होते. मात्र, त्यालाही पहिल्या आणि दुसऱ्या लग्नापासून मुलं नव्हती. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर राजेशच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्या. त्याच्या पोटावर अतिशय लांब आणि खोल जखमही असल्याचे समोर आले. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेले तब्बल तीन चाकू जप्त केले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.