Nashik Crime News : नाशिक हादरलं! भररस्त्यात शिवसेनेच्या विभागप्रमुखावर कोयत्यानं सपासप वार; हल्ल्यात पदाधिकारी गंभीर जखमी

हल्लेखोरांनी केवळ मारहाणच केली नाही, तर संबंधित कार्यालयाची तोडफोडही केली.
Nashik Crime News : नाशिक हादरलं! भररस्त्यात शिवसेनेच्या विभागप्रमुखावर कोयत्यानं सपासप वार; हल्ल्यात पदाधिकारी गंभीर जखमी

नाशिक: शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. सुयश पाटील या शिवसेना शिंदे गटाच्या विभागप्रमुखावर भरदिवसा कोयत्याने आणि चाकूने हल्ला करण्यात आला आहे.

ही घटना नाशिकमधील दत्त चौक परिसरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे समोर येत आहे. तीन ते चार जणांनी अचानक हल्ला करत सुयश पाटील यांच्यावर सपासप वार केले.

हल्लेखोरांनी केवळ मारहाणच केली नाही, तर संबंधित कार्यालयाची तोडफोडही केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा: PM Narendra Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन! तब्बल 40 मिनिटांच्या संभाषणात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा; लवकरच होऊ शकते मोठी घोषणा

या प्रकरणातील आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी दिली आहे. 

दरम्यान, नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा अशा प्रकारे राजकीय पदाधिकाऱ्यावर हल्ला होणे, ही गंभीर बाब मानली जात आहे. आता पोलिसांकडून आरोपींना किती लवकर अटक होते आणि या हल्ल्यामागचे नेमके कारण काय होते, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. 

हेही वाचा: Agriculture Fund Scheme: आता शेतकरी होणार ‘बिझनेसमन’! पाहा कशी मिळवायची सात वर्षांसाठी व्याजात मोठी सूट; नवीन सरकारी योजना

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version