Ammy Virk Attack: कॅनडामध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक अ‍ॅमी विर्कच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार; 7 ते 10 गोळ्या झाडल्याचा दावा

कॅनडामध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता अ‍ॅमी विर्क याच्या ताफ्यातील एका वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला.
Ammy Virk Attack: कॅनडामध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक अ‍ॅमी विर्कच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार; 7 ते 10 गोळ्या झाडल्याचा दावा

Punjabi Singer Ammy Virk Convoy Attack in Abbotsford: कॅनडात पुन्हा एकदा पंजाबी संगीत क्षेत्रातील कलाकाराला लक्ष्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता अ‍ॅमी विर्क याच्या ताफ्यातील एका वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. शनिवारी, 5 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास ॲबट्सफोर्ड येथील 'रॉजर्स फोरम'मध्ये आयोजित संगीत कार्यक्रम आटोपून निघत असताना ही घटना घडली. मॅकक्युलम रोडवरून जात असलेल्या ताफ्याला एका काळ्या रंगाच्या एसयूव्हीमधून आलेल्या बंदुकधाऱ्यांनी लक्ष्य केले.

बुलेटप्रूफ गाडीमुळे बचावले प्राण; 7 ते 10 गोळ्या झाडल्याचा दावा
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी अ‍ॅमी विर्कच्या ताफ्यातील वाहनावर सुमारे 7 ते 10 गोळ्या झाडल्या. ज्या गाडीवर हा हल्ला झाला ते वाहन बुलेटप्रूफ (रॉल्स रॉयस) असल्याने सुदैवाने या घटनेत अ‍ॅमी विर्क, कार्यक्रमाचे आयोजक किंवा ताफ्यातील अन्य कोणीही जखमी झाले नाही. ज्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले, त्यामध्ये सरे येथील एका प्रसिद्ध पंजाबी रेडिओ स्टेशनच्या मालकाचा मुलगा (प्रमोटर) देखील उपस्थित असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

हेही वाचा – Baljeet Singh Death : धक्कादायक ! घरातच कुजलेल्या अवस्थेत आढळला पंजाबी गायकाचा मृतदेह; चार – पाच दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा संशय

गोळीबारानंतर थोड्याच अंतरावर एसयूव्ही जळून खाक
गोळीबाराच्या या भयानक घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांतच घटनास्थळापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या सनसाईड प्लेसच्या 2400 ब्लॉकमध्ये एका एसयूव्हीला भीषण आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधिकारी तिथे पोहोचले तेव्हा ती गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. हल्लेखोरांनी गोळीबारानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी वापरलेले वाहन पेटवून दिले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

कॅनडा पोलिसांच्या मेजर क्राइम ब्रांचकडून सखोल तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच ॲबट्सफोर्ड पोलिसांचे पथक दाखल झाले असून 'मेजर क्राइम युनिट'ने या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. पोलीस सार्जंट पॉल वॉकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता आहे. पोलीस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डॅशकॅम फुटेज गोळा करत असून दोन्ही घटनांमधील संबंध तपासत आहेत. कॅनडामध्ये याआधीही अनेक पंजाबी कलाकारांवर असे जीवघेणे हल्ले झाले असून या घटनेमुळे संगीत वर्तुळात प्रचंड घबराट पसरली आहे.

हेही वाचा – Singer Nisar Wayanad: दुबईत कॉन्सर्टच्या काही तास आधी तब्येत खालावली अन् गायकाचा मृत्यू, इंडस्ट्रीत खळबळ

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version