Panvel Crime : दीर म्हणून जवळीक वाढवली, पतीसोबत मिळून रचला भयंकर कट; महिलेसोबत जे केलं ते धक्कादायक…; नवी मुंबईत

गव्हाण फाटा उड्डाणपुलाखाली एका महिलेचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि घटनेची गंभीरता पाहता
Panvel Crime : दीर म्हणून जवळीक वाढवली, पतीसोबत मिळून रचला भयंकर कट; महिलेसोबत जे केलं ते धक्कादायक…; नवी मुंबईत

नवी मुंबई : पनवेलमध्ये पतीने मित्राच्या मदतीनेच आपल्या जोडीदाराची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर मृतदेह हा गव्हाण फाटा उड्डाणपुलाकाखी खड्डा करुन तो अर्धवटच पुरण्यात आला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्राला सध्या अटक केली आहे.

ज्याला दीर मानलं त्याच्याकडूनच घात
मिळालेल्या माहितीनुसार, गव्हाण फाटा उड्डाणपुलाखाली एका महिलेचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि घटनेची गंभीरता पाहता तपास ही सुरु केला. याच तपासादरम्यान हा मृतदेह बीबीयाना हिरेन या महिलेचा असल्याचे समोर आले.

हेही वाचा-Doctor Death : 22 वर्षीय BAMS डॉक्टरचा झोपेतच संशयास्पद मृत्यू, ओषधांचा ओव्हरडोस की आणखी काय?; पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर

नेमकं घडलं काय?
पोलिसांच्या माहितीनुसार, बीबीयाना या महिलेच्या चारित्र्यावर तिचा पती सुशील हिरेन गेल्या काही दिवसांवर संशय घेत होता. मात्र, दररोज हा संशय सुशीलच्या रागात बदलला. याच रागातून सुशील याने आपला मित्र रमेशला बोलतवत सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर सुशीलने रमेशच्या मदतीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली. मात्र, सुशीलचा राग इतक्यावर शांत झाला नाही तर त्याने सर्वच मर्यादा ओलांडली.

आपल्या मित्राला बोलावून सुशीलने बीबीयानाला मारहाण केली आणि त्यानंतर तिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघांनी तातडीने गव्हाण फाटा परिसर गाठला. तेथे लोकांच्या नकळत खड्डा करुन बिबीयानाचा मृतदेह अर्धवट पुरला. मात्र, मृतदेह अर्धवट  पुरलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरु झाला.  पोलिसांनी तपास लवकरात लवकर लागण्यासाठी, घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेत तांत्रिक तपासाच्या आधारे अखेर पोलिसांनी या प्रकरणातील संशयितांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा-Crime News: वडिलांना वाचवायला धावली अन् जिवाला मुकली; जमिनीच्या वादातून सख्ख्या भावांनी बाप-लेकीला संपवलं

अखेर तपासादरम्यान पोलिसांनी सुशील हिरेन तसेच त्याचा मित्र रमेश एक्का यांच्यावर संशय आला. त्यानंतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिसांच्या तपासानुसार, पत्नीच्या चारित्र्यावरुनच असलेल्या संशयातून हा सर्व हत्येचा प्रकार घडला. सध्या पनवेल शहर पोलिसांनी सुशील हिरेन आणि रमेश एक्का या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मात्र, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version