नाशिक : तुरुंगातून बाहेर पडताच गंभीर गुन्ह्यांतील आरोपी हर्षद पाटणकर याची मिरवणूक काढण्यात आली. पाटणकरच्या टोळीतील गुंडांनी ही मिरवणूक काढल्याचे स्थानिकांनी सांगितले. या प्रकरणाची पोलीस चौकशी झाली. सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि हर्षद पाटणकरची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी झाली. हर्षदसह मिरवणुकीत सहभागी झालेल्या सात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बेकायदा मिरवणूक काढून रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, आरडाओरडा करणे, आक्षेपार्ह भाषा वापरणे, विनाकारण हॉर्न वाजवून दहशत निर्माण करणे या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली.
कोण आहे हर्षद पाटणकर ?
नाशिक पोलिसांनी हर्षदला २०२३ मध्ये एमपीडीए कायद्यानुसार नाशिक रोड कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केले होते. हर्षद मंगळवारी कारागृहातून बाहेर आला. बाहेर पडताच त्याची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे व्हिडीओ व्हायरल झाले. व्हायरल व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी तपास करुन कारवाई केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.