Mumbai Metro 4 Accident : वडाळा येथील स्टेजिंग कोसळून 2 जणांचा मृत्यू; MMRDA ने कंत्राटदारासह सल्लागाराला ठोठावला 6 कोटींचा दंड

Mumbai Metro 4 Accident : वडाळा येथील स्टेजिंग कोसळून 2 जणांचा मृत्यू; MMRDA ने कंत्राटदारासह सल्लागाराला ठोठावला 6 कोटींचा दंड

मुंबई : वडाळा येथील 'भक्ती पार्क' मेट्रो स्थानकाच्या बांधकामस्थळी गेल्या शनिवारी लोखंडी सांगाडा (स्टेजिंग) कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) मेट्रो मार्ग 4 च्या कंत्राटदारावर आणि मुख्य सल्लागारावर 6 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एमएमआरडीएने सांगितले की, सविस्तर तपासणीत सुरक्षेतील त्रुटी आढळून आल्या असून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कंत्राटदार, आरइन्फ्रा-अस्ताल्डी जेव्हीला 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर डीबी इंजिनिअरिंग अँड कन्सल्टिंग जीएमबीएच, हिल इंटरनॅशनल आणि लुई बर्जर कन्सल्टिंग यांच्या जनरल कन्सल्टंट कन्सोर्टियमला ​​1 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

वडाला टीटी पोलिसांनी 'उप-कंत्राटदार' तारिख उल इस्लाम यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 106(1) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. जे निष्काळजी किंवा बेपर्वा कृत्याने मृत्यूला कारणीभूत ठरण्याशी संबंधित आहे. शुक्रवार दुपारपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : Nashik Manisha Jejurkar Case: अटकपूर्व जामीन नाकारला अन् डॉक्टर पती अडचणीत; डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणाला नवं वळण

ही घटना शनिवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास वडाळा येथील भक्ती पार्क मेट्रो स्थानकाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी घडली. यावेळी पहिल्या मजल्यावरून खाली उतरण्यासाठी कामगारांनी वापरलेले लोखंडी (मचान/सांगाडा) सेंट्रिंगचे काम करणारे दोन कामगार दगावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 वर्षीय मजूर सफिकुल मुख्तार हुसेन हा नहिज (वय 33) आणि साकिम (वय 37) यांच्यासोबत या ठिकाणी काम करत होता. हे तिघेही बांधकाम सुरू असलेल्या स्थानकावर सेंट्रिंगचे काम करत होते. हुसेनने पोलिसांना सांगितले की, नहिज आणि साकिम लोखंडी स्टेजिंगवरून खाली उतरत असताना ते अचानक कोसळले, ज्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. जखमी कामगारांना खाजगी वाहनांतून सायन रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोहोचताच नहिजला मृत घोषित करण्यात आले, तर साकिमचा नंतर आयसीयूमध्ये (ICU) उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version