Spurious Liquor: धक्कादायक बातमी! नशा बेतली जीवावर; बनावट दारुने घेतले 9 बळी, परिसरात खळबळ

ग्रामस्थांनी स्थानिक अवैध अड्ड्यावरून आणलेली दारू प्यायली होती. यानंतर काही वेळातच त्यांना तीव्र मळमळ, उलट्या, चक्कर येणे आणि डोळ्यांसमोर अंधारी येण्याचा त्रास होऊ लागला.
Spurious Liquor: धक्कादायक बातमी! नशा बेतली जीवावर; बनावट दारुने घेतले 9 बळी, परिसरात खळबळ

Spurious Liquor Kills 9 : स्थानिक पातळीवर मिळणारी अवैध अड्ड्यावरून आणलेली बनावट आणि विषारी दारू प्यायल्यामुळे तब्बल 9 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भीषण घटनेमुळे ग्रामीण परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण पसरले आहे.

विषारी दारूमुळे प्रकृती ढासळली अन् अनर्थ घडला
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री काही ग्रामस्थांनी स्थानिक अवैध अड्ड्यावरून आणलेली दारू प्यायली होती. दारूचे सेवन केल्यानंतर अवघ्या काही वेळातच त्यांना तीव्र मळमळ, उलट्या, चक्कर येणे आणि डोळ्यांसमोर अंधारी येण्याचा त्रास सुरू झाला. बाधितांची प्रकृती वेगाने खालावल्याने नातेवाइकांनी त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान 9 जणांची प्राणज्योत मालवली. हा प्रकार मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील गूगरा, नौराज परिसरात घडला आहे.

सागर जिल्ह्यातील बंडा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. विषारी दारूमुळे 9 जणांचा मृत्यू झाला असून अनेक रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. घटनेनंतर सागर जिल्हा पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा – Driving Licence New Rules : आता केवळ दंड भरून सुटका नाही; 'या' एका चुकीमुळे ड्रायव्हिंग लायसन्स थेट होणार रद्द! नितीन गडकरींनी सांगितलं..

अवैध अड्ड्यांवर पोलिसांचे छापे आणि कारवाईचे सत्र

या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून तपास चक्रे वेगाने फिरवली आहेत. स्थानिक पातळीवर विषारी दारू तयार करणाऱ्या आणि तिची अवैध विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर प्रशासनाकडून छापे टाकले जात आहेत. ही बनावट दारू नेमकी कुठून पुरवली गेली आणि या रॅकेटमागे कोण मुख्य सूत्रधार आहे, याचा कसून शोध घेतला जात आहे.

प्रशासनाविरोधात नागरिकांचा तीव्र संताप
या प्राणघातक दुर्घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. परिसरात उघडपणे चालणाऱ्या अवैध दारू विक्रीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, असा गंभीर आरोप करत नागरिकांनी दोषींवर आणि बेकायदा दारू माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.

हेही वाचा – Navi Mumbai : धक्कादायक! सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने लॉजमध्ये घेतला गळफास; 8 पानी नोट, अखेरचा व्हिडीओ शेअर करत सांगितलं कारण

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version