माझगाव गोदीने ‘एवढ्या’ महिन्यात उभारली युद्धनौका

माझगाव गोदीने ‘एवढ्या’ महिन्यात उभारली युद्धनौका

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : माझगाव गोदीने तेरा महिन्यांत महेंद्रगिरी ही युद्धनौका उभारली. ही कामगिरी करून माझगाव गोदीने युद्धनौका कमी काळात उभारण्याचा विक्रम केला.

भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाल्यानंतर महेंद्रगिरी या युद्धनौकेचे नाव आयएनएस महेंद्रगिरी असे होणार आहे. या युद्धनौकेचे शुक्रवार १ सप्टेंबर २०२३ रोजी जलावतरण होणार आहे.

माझगाव गोदीच्या प्रकल्प १७ अ अंतर्गत निलगिरी श्रेणीत चार युद्धनौका करण्याची योजना होती. महेंद्रगिरी ही या योजनेतील चौथी आणि शेवटची युद्धनौका आहे. ही फ्रिगेट श्रेणीतील युद्धनौका आहे. याआधीच्या तीन युद्धनौकांचे अनुक्रमे सप्टेंबर २०१९, मे २०२२ आणि सप्टेंबर २०२३ मध्ये जलावतरण झाले. या तिन्ही युद्धनौकांच्या उभारणीचा कालावधी वेगवेगळा होता. ‘निलगिरी’चा कालावधी २१ महिने, ‘उदयगिरी’चा कालावधी तीन वर्षे आणि ‘तारागिरी’चा कालावधी दोन वर्षांचा होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version