Jalgaon Crime : हृदयद्रावक! ऐन गणपतीच्या सणाला आपल्या मुलासह महिलेनं उचललं टोकाचं पाऊल; परिसरात हळहळ व्यक्त

Jalgaon Crime : हृदयद्रावक! ऐन गणपतीच्या सणाला आपल्या मुलासह महिलेनं उचललं टोकाचं पाऊल; परिसरात हळहळ व्यक्त

जुगल पाटील, प्रतिनिधी 

जळगाव : गणेशोत्सवाच्या उत्साहात सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच जळगाव शहरातील दशरथनगर परिसरातील तळेले कॉलनीतून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. घरात गणपती बाप्पाच्या स्थापनेची तयारी सुरू असतानाच एका विवाहितेने आपल्या चार वर्षांच्या चिमुकल्यासह जीवनयात्रा संपवल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. हेमांगी निखिल महाजन आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा शौर्य महाजन अशी मृत माय-लेकाची नावे आहेत. हेमांगी यांचे पती निखिल महाजन हे सैन्य दलात कार्यरत असून सध्या राजस्थान येथे सेवेत आहेत.

हेही वाचा : Big News: राजकारणात मोठा भूकंप! NCPI चे ते 17 बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर; तोडफोड आणि पक्षाच्या कार्यालयाला आग

सायंकाळी घरासह गल्लीतील मंडळाची गणपती बाप्पाच्या स्थापनेची तयारी सुरू असताना कुटुंबीय पूजेच्या तयारीत व्यग्र होते. याचदरम्यान हेमांगी या मुलाला घेऊन खोलीत गेल्या. पूजा सुरू होण्याची वेळ झाली तरी त्या बाहेर न आल्याने कुटुंबियांनी त्यांना बोलावण्यासाठी खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने कुटुंबीयांनी शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर खोलीत माय-लेकाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. दोघांनाही तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान, माय-लेकाने एकाच साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version