Advait Upadhyay Case : बेपत्ता होणे हे अद्वैतचे प्रेयसीला घाबरवण्याचे नाटक की नियोजित कट? तपासाला धक्कादायक वळण

येत्या जानेवारी महिन्यात अद्वैतचे लग्न ठरणार होते, परंतु या घटनेनंतर तो अपघाताचा बळी ठरला की त्याने स्वतःहून गायब होण्याचा कट रचला, याचे गूढ अधिक वाढले आहे.
Advait Upadhyay Case : बेपत्ता होणे हे अद्वैतचे प्रेयसीला घाबरवण्याचे नाटक की नियोजित कट? तपासाला धक्कादायक वळण

Advait Upadhyay IIT engineer missing Shivagange Hills 2026: बंगळुरू येथील काडुगोडी परिसरात राहणारा आणि पेशाने सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट असलेला आयआयटी ग्रॅज्युएट अद्वैत उपाध्याय मागच्या 6 दिवसांपासून रहस्यमयरीत्या बेपत्ता आहे. 7 ऑगस्टच्या सकाळी 50 किमी अंतरावर असलेल्या शिवगंगे टेकडीवर तो एकटाच ट्रेकिंगसाठी गेला होता. सकाळी 7:30 वाजता भाड्याची दुचाकी पायथ्याशी पार्क करून ट्रेकला निघाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले. एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF), पोलीस आणि कोथिराज यांच्या 100 हून अधिक जणांच्या बचाव पथकाने संपूर्ण डोंगर पिंजून काढला. ड्रोन पाहणीदरम्यान 'शांताला ड्रॉप' दरीत एका मृतदेहासारखी वस्तू दिसली असली, तरी खडतर वातावरणामुळे प्रत्यक्ष शोधमोहीम थांबवून आता पोलीस तांत्रिक तपासावर भर देत आहेत.

मोबाईल लोकेशन कुडुर भागात; 'होणाऱ्या पत्नीला' शेवटचा फोटो पाठवून फोन बंद
डोंगरावर पोहोचल्यानंतर अद्वैतने आपली होणारी पत्नी प्राप्ती चौहान हिला एक सेल्फी पाठवला आणि त्यानंतर लगेचच त्याचा फोन बंद झाला. सुरुवातीला तो डोंगरावरून खाली कोसळल्याचा संशय होता; मात्र पोलिसांनी केलेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणानंतर (Technical Analysis) त्याचे शेवटचे लोकेशन शिवगंगेच्या मुख्य मार्गाऐवजी कुणिगल रस्त्यावरील 'कुडुर' (Kudur) भागात आढळल्याने खळबळ उडाली आहे. येत्या जानेवारी महिन्यात अद्वैतचे लग्न ठरणार होते, परंतु या घटनेनंतर तो अपघाताचा बळी ठरला की त्याने स्वतःहून गायब होण्याचा कट रचला, याचे गूढ अधिक वाढले आहे.

लॅपटॉप अन् चॅट जीपीटीवर धोकादायक सर्च हिस्ट्री; घरून मिळाले संशयास्पद पुरावे
पोलीस तपासात अद्वैतच्या घरातील लॅपटॉप आणि डिजिटल फूटप्रिंट्सची तपासणी करण्यात आली असता धक्कादायक माहिती समोर आली. त्याने आधीच शिवगंगे हिल्स, शांताला ड्रॉप आणि 'उंचावरून पडल्यानंतर मृत्यू कसा होतो?' अशा गोष्टी चॅट जीपीटीवर (ChatGPT) सर्च केल्याचे उघड झाले. तपासादरम्यान डोंगरावर त्याची शोल्डर बॅग आणि स्वेटर तर सापडले, परंतु सायबर तज्ज्ञ असल्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठीच त्याने मोबाईल फेकून देऊन गायब होण्याचे नियोजन केले असावे, असा संशय बळावला आहे.

हेही वाचा – Moshi Garbage Depot Tragedy: मोशी कचरा डेपो दुर्घटना! पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही जीवन संपवलं; 'हे' धक्कादायक कारण आलं समोर, नातेवाइकांचा दावा

प्रेयसीला घाबरवण्यासाठी गायब होण्याचे नाटक? पोलिसांची बँक खात्यांवर करडी नजर
डबसपेट आणि कडुगोडी पोलीस आता या प्रकरणाच्या मूळ मुळाशी जात आहेत. अद्वैत मुद्दामहून बेपत्ता झाल्याचा किंवा प्रेयसीला घाबरवण्यासाठी अथवा इतर कौटुंबिक कारणांमुळे लपल्याचा संशय सार्वजनिक अहवालांमधून व्यक्त केला जात आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे त्याने हे सर्व प्लॅनिंग करून केले आहे का, हे तपासण्यासाठी पोलीस आता त्याच्या बँक खात्यांचे आर्थिक व्यवहार आणि डिजिटल हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

'तू नाटक करू नकोस, परत ये!'; प्रसिद्ध ट्रेकर कोथिराज यांचे भावूक आवाहन
चित्रदुर्गहून आलेल्या प्रसिद्ध ट्रेकर कोथिराज आणि त्यांच्या टीमने शिवगंगेच्या कठीण दरीखोऱ्यात अद्वैतचा शोध घेतला. टेकड्यांवर काही जुन्या बॅग आणि चपला मिळाल्या, पण त्या अद्वैतच्या नव्हत्या. 'आम्ही डोंगर पालथा घातला, एनडीआरएफ खाली उतरली, पण तो कुठेच सापडला नाही. अद्वैत आता या डोंगरावर नाहीये,' असा दावा करत कोथिराज म्हणाले, 'अद्वैत, तू नाटक करू नकोस. जिथे असशील तिथून परत ये, अनेक लोक कठीण वातावरणात जीव धोक्यात घालून तुझा शोध घेत आहेत.'

हेही वाचा – Pitbull Dog Attack: "पत्नीवर सर्जरी अजूनही ICU मध्ये, माझ्या शरीरावर टाके" पिटबुलचा हल्ल्यानंतर जखमी अंकितनं सांगितली आपबिती

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version