Crime News: बायकोकडे 20 रुपयांची मागणी; नकार मिळताच नवऱ्याने आधी गळा आवळला आणि मग ट्रेनखाली…

 कुटुंबात होणारी छोटीमोठी भांडणं ही अनेकदा सामान्य बाब मानली जातात.
Crime News: बायकोकडे 20 रुपयांची मागणी; नकार मिळताच नवऱ्याने आधी गळा आवळला आणि मग ट्रेनखाली…

Crime News: कुटुंबात होणारी छोटीमोठी भांडणं ही अनेकदा सामान्य बाब मानली जातात. मात्र या वादांवर वेळेत आणि समजूतदारपणाने तोडगा न निघाल्यास त्याचे परिणाम अतिशय गंभीर ठरू शकतात. दिल्लीतील शाहदरा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने हेच पुन्हा एकदा समोर आणलं आहे. केवळ २० रुपयांच्या कारणावरून झालेल्या वादातून एका पतीने पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं.

पूर्व दिल्लीतील शाहदरा भागात कुलवंत सिंग, त्यांची पत्नी महिंदर कौर आणि कुटुंब राहत होतं. कुलवंत आणि महिंदर यांच्यात नेहमीच घरगुती कारणांवरून वाद व्हायचा, अशी माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं. कुलवंतने महिंदरकडे २० रुपये मागितले, मात्र तिने ते देण्यास नकार दिला. हा नकार कुलवंतला सहन न झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.

हेही वाचा:Crime News: ऐकावं ते नवलच! शुल्लक कारणावरून जावयाने थेट सासरवाडीवर चालवला बुलडोझर ; आधी भिंत पाडली आणि मग…

रागाच्या भरात कुलवंतने घराच्या छतावर महिंदरचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह शालमध्ये गुंडाळून घरातील एका खोलीत ठेवण्यात आला. दुपारी सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास महिंदरच्या दिराला शेजाऱ्यांकडून फोन आला. घरात काहीतरी चुकीचं घडल्याची शंका व्यक्त करत त्यांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली.

पोलिस घटनास्थळी पोहोचले असता महिंदर मृतावस्थेत आढळली. सुरुवातीला कुटुंबीयांकडून आत्महत्येचा दावा करण्यात आला, मात्र पोलिसांना महिंदरच्या गळ्यावर स्पष्ट जखमेच्या खुणा दिसून आल्या. शवविच्छेदन अहवालातही गळा दाबून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला.

हेही वाचा:Transgender Nagarsevak Candidate Death: सोलापूर हादरलं ! तृतीयपंथी नगरसेवकपदाच्या उमेदवाराला संपवलं, धक्कादायक कारण समोर

दरम्यान, या घटनेनंतर कुलवंत घरातून फरार असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. काही वेळातच कुलवंत रेल्वे रुळांवर आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच तो घाबरून चालत्या ट्रेनसमोर पळाला आणि उडी मारली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, कुलवंत आणि महिंदर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू असून, घरगुती वाद किती टोकाला जाऊ शकतात याचं हे विदारक उदाहरण असल्याचं बोललं जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version