Pune Crime : आधी लेकाचा जीव घेतला, नंतर लेकीवरही प्राणघातक हल्ला… वाघोलीत जन्मदात्या आईच्या क्रूर कृत्याने संपूर्ण शहर हादरलं

वाघोली परिसरातील बाईफ रोडवर एका जन्मदात्या आईने आपल्या 11 वर्षांच्या पोटच्या गोळ्याला संपवलं. तसेच 13 वर्षांच्या मुलीलाही संपवण्याचा प्रयत्न केला.
Pune Crime : आधी लेकाचा जीव घेतला, नंतर लेकीवरही प्राणघातक हल्ला… वाघोलीत जन्मदात्या आईच्या क्रूर कृत्याने संपूर्ण शहर हादरलं

Pune Crime :  विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात पुन्हा एकदा रक्ताचे नाते विसरायला लावणारी एक भीषण घटना घडली आहे. वाघोली परिसरातील बाईफ रोडवर एका जन्मदात्या आईने आपल्या 11 वर्षांच्या पोटच्या गोळ्याला संपवलं. तसेच 13 वर्षांच्या मुलीलाही संपवण्याचा प्रयत्न केला. या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे.

काळजाचा थरकाप उडवणारी घटना 

मिळालेल्या माहितीनुसार, सोनी संतोष जायभाय (मूळ रा. कंधार, नांदेड) या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरातील पांढऱ्या फरशीवर सांडलेला रक्ताचा सडा या कृत्याची भीषणता सांगत होता. या हल्ल्यात साईराज संतोष जायभाय (11) या मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची मोठी बहीण धनश्री (13) ही गंभीर जखमी झाली आहे. सुदैवाने ती या मृत्यूच्या विळख्यातून थोडक्यात बचावली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – Pune Crime News: ‘माहेरून 25 लाख आण, नाहीतर…’; इंजिनियर सुनेचा अमानवीय छळ; पुण्यात सासू सासऱ्यांच्या छळाला कंटाळून विवाहितेनं संपवलं आयुष्य

वाघोलीत भीतीचे सावट

वाघोली परिसरात गेल्या 48 तासांतील ही दुसरी मोठी गुन्हेगारी घटना आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. मात्र, ‘ज्या आईने जन्म दिला, तिच काळाचा घाला कशी बनू शकते?’ असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

वाघोली पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या भयंकर कृत्यामागे नेमके काय कारण आहे? घरामध्ये काही कौटुंबिक कलह होता का? महिला दीर्घकाळापासून मानसिक तणावाखाली होती का? की यामागे आणखी काही गुप्त कारण दडलेले आहे? या सर्व बाजू पडताळून पाहिल्या जात आहेत.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version