Ketan Agrawal Case: केतनच्या हत्येचं गुढ सुटता सुटेना! आता तिसऱ्याची एन्ट्री; केतनचा काटा काढला अन् सिया-चेतन पहिले त्याला भेटल

केतन अग्रवालची हत्या करण्यासाठी सिया आणि चेतनला आणखी कोणाची तरी मदत मिळाली असावी, असा संशय पुणे ग्रामीण पोलिसांना सुरुवातीपासूनच होता पोलिसांचा हाच संशय आता तपासात खरा ठरला आहे.
Ketan Agrawal Case: केतनच्या हत्येचं गुढ सुटता सुटेना! आता तिसऱ्याची एन्ट्री; केतनचा काटा काढला अन् सिया-चेतन पहिले त्याला भेटल

केतन अग्रवाल हत्याप्रकरणी अटकत असलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरीचे पोलीस कोठडी आज संपणार आहे. आज दुपारी पुणे ग्रामीण पोलीस सिया आणि चेतनला कोर्टासमोर हजर करणार आहेत. पुढे ग्रामीण पोलीस पुन्हा दोन दिवसांची दोघांचीही पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे. केतन अग्रवाल खून प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपासाला वेग आला असून काल सिया गोयलला तिच्या राहत्या घरी नेत पुणे पोलिसांनी तपास केला.

तर आज दुपारी पुणे ग्रामीण पोलीस या दोघांना कोर्टात हजर करत पुन्हा पोलीस कोठडी वाढवून मागणार आहेत. दरम्यान केतन अग्रवालची हत्या करण्यासाठी सिया आणि चेतनला आणखी कोणाची तरी मदत मिळाली असावी, असा संशय पुणे ग्रामीण पोलिसांना सुरुवातीपासूनच होता पोलिसांचा हाच संशय आता तपासात खरा ठरला आहे. केतनच्या हत्येचा संपूर्ण प्लॅन माहिती असलेला हा तिसरा तरुण दुसरा कोणी नसून मुख्य आरोपी चेतन चौधरी याचा वर्गमित्र आहे.

केतन अग्रवालच्या खूनाचा कट रचतेवेळी चेतन चौधरी याचा वर्गमित्र देखील चेतन आणि सिया या दोघांच्या प्लॅनमध्ये सामील होता. ज्यावेळेस केतनला लोहगडावरून ढकलून त्याची हत्या केली त्यानंतर सिया आणि चेतन पहिल्यांदा याच तरुणाला भेटण्यासाठी गेले होते. मात्र तो तरुण 18 जून रोजी लोहगडावर गेला नव्हता. तसेच या तरुणाने केतन याचा खून करू नका, असं सिया आणि चेतनला बजावलं होत. तरी देखील सिया आणि चेतनने त्याच काहीच न ऐकून घेता केतनची हत्या केली.

हेही वाचा- Malegaon Girl Case : नसरापूर प्रकरणानंतर या खटल्याकडे महाराष्ट्राचे लक्ष, लवकरच निकाल लागणार; पाहा काय म्हणाले ॲड. उज्ज्वल निकम

केतन अग्रवाल प्रकरणात एन्ट्री झालेला हा तिसरा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या तो पुण्याच्या बालेवाडी येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. पुणे ग्रामीण पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या चौकशीतून समोर आले की, मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापासून तो चेतनाच्या संपर्कात होता. दरम्यान या नव्या खुलाशामुळे आता कोर्टात आज होणाऱ्या सुनावणीकडे आणि पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पॉलीग्राफ चाचणीसाठी पुणे पोलिसांचा न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सिया आणि चेतन यांची चाचणी घेण्याची परवानगीसाठी आणि त्यामागील कारणे स्पष्ट करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. न्यायालयाने परवानगी दिल्यास आणि दोन्ही आरोपी स्वेच्छेने चाचणी देण्यास तयार झाल्यासच त्यांची तपासणी केली जाईल. या चाचणीमध्ये चौकशी सुरू असताना व्यक्तीचा रक्तदाब, नाडी, श्वासोच्छ्वास आणि त्वचेच्या प्रतिक्रिया मोजल्या जातात. तपास यंत्रणा याचा उपयोग केवळ तपासात मदत करण्यासाठी आणि उत्तरांमधून फसवणूक सूचित होते की नाही? हे ठरवण्यासाठी करतात. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version