रेल्वेतील सूटकेसमध्ये सापडले मृत महिलेचे सडलेले आणि डोके नसलेले अवशेष! भयंकर प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट

प्राथमिक तपासात सूटकेसमध्ये 'चेन्नई' नाव लिहिलेली एक प्लास्टिक पिशवी मिळून आली, ज्याच्या आधारे तपास यंत्रणांनी आपला मोर्चा चेन्नईकडे वळवला.
रेल्वेतील सूटकेसमध्ये सापडले मृत महिलेचे सडलेले आणि डोके नसलेले अवशेष! भयंकर प्रकारामुळे प्रवाशांमध्ये घबराट

Chennai Suitcase Murder Case : आग्रा कँट रेल्वे स्थानकावर 6 ऑगस्ट रोजी तमिळनाडू एक्स्प्रेसच्या (Train No. 12621) मागच्या जनरल डब्यात सोडलेल्या एका बेवारस लाल सुटकेसमध्ये महिलेचे सडलेले आणि डोके नसलेले अवशेष आढळून आल्याने देशभरात खळबळ उडाली होती. या प्रवासादरम्यान दुर्गंधी पसरल्यानंतर प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाने बॅग उघडून पाहिली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. प्राथमिक तपासात सूटकेसमध्ये 'चेन्नई' नाव लिहिलेली एक प्लास्टिक पिशवी मिळून आली, ज्याच्या आधारे तपास यंत्रणांनी आपला मोर्चा तमिळनाडूची राजधानी चेन्नईकडे वळवला.

350 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी; भाड्याच्या घरात आढळले भयानक दृश्य
रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि चेन्नई पोलिसांनी 350 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. यामध्ये 3 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 10 वाजता चेन्नई सेंट्रल स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर एक पुरुष आणि महिला तीच लाल सुटकेस घेऊन जाताना व ट्रेनमध्ये ठेवताना स्पष्ट दिसले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस थेट चेन्नईतील गुडुवांचेरी परिसरातील एका भाड्याच्या घरापर्यंत पोहोचले. त्या बंद घरात तपास पथकाने प्रवेश केला असता, छताला लटकलेल्या अवस्थेत मृतदेहाचा काही भाग आणि उरलेले अवशेष बिर्याणी बनवण्याच्या मोठ्या भांड्यात ठेवलेले आढळले.

हेही वाचा – Baramati Crime: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; रात्री आईसोबत भांडण करून घरातून बाहेर पडली अन्…

हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट; फॉरेन्सिक तपास आणि शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष
पीडित महिला आणि संशयितांमध्ये नेमके काय संबंध होते तसेच ही क्रूर हत्या कोणत्या कारणातून करण्यात आली, याचे कारण आरोपींच्या अटकेनंतरच समोर येऊ शकेल. सध्या पोलिसांनी घटनास्थळावरून बिर्याणीचे भांडे आणि इतर जैविक पुरावे जप्त करून न्यायवैद्यकीय तपासणीसाठी (Forensic Analysis) पाठवले आहेत. या भीषण हत्याकांडामुळे परिसरात आणि रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

फरार संशयितांचा पाठलाग सुरू
अधिक पुराव्यांसाठी त्या घराची झडती घेतली जात आहे. तसेच मोबाईल लोकशनची तपासणी सुरू आहे. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत्यूचे नेमकं कारण आणि प्रकार शोधण्यासाठी तिचे अवशेष शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पीडितेची ओळख पटवण्यासाठी पोलीस बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारी आणि इतर नोंदी देखील तपासत आहेत. सुटकेससोबत दिसलेल्या पुरुष आणि महिलेची ओळख आणि ते सध्या कुठे आहेत, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. महिलेचा मृत्यू नेमक्या कोणत्या परिस्थितीत झाला हे स्पष्ट झालेले नाही. अनेक बाजूंनी तपास सुरू आहे.

हेही वाचा – Pune Crime : नोकरीचं आमिष दाखवलं, लॉजमध्ये डांबलं अन्…; शिरुरमध्ये 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version