गुजरातमधील सुरतमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 41 प्रवासी गंभीर जखमी झाले असून आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ड्रायव्हर आणि जळगावमधील रहिवासी यांच्या व्यतिरिक्त इतर 5 जणांची ओळख पटू शकली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, उवा गावापासून काही अंतरावर पाण्याचा टँकर पलटी झाला होता. तर धुळे आगाराची बस सुरतकडे जात होती. त्यावेळेस पलटी झालेल्या टँकरकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ड्रायव्हरने बस वळवण्याचा प्रयत्न केला, यावेळी दुसऱ्या बाजूने येत असलेल्या सुरत-जामनेर या बसला धुळे आगाराच्या बसची धडक लागली. या धडकेत सुरत-जामनेर बस मार्गालगतच्या पाटात पडल्याने तिला आग लागली. दरम्यान या घटनेतील जखमींवर उपचार सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
यावेळी बारडोली बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील कुरा पानांचे गावातील रहिवासी असलेले घनश्याम बर्कले यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याघटनेत त्यांच्या मृत्यूची बातमी आज पहाटे त्यांच्या कुटुंबियांना कळल्यानंतर त्यांच्या परिवाराने आक्रोश केल्याचं पाहायला मिळाला आहे.
घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “गुजरातमधील सुरत महाराष्ट्र महाराष्ट्रातील एस बसचा निवडणूक काही जणांचा सामनाची घटना गंभीर आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांचे दु:खात आम्ही सहभागी आहोत. एसटी आणि जळगाव जिल्हा प्रशासन सुरत जिल्हा प्रशासक संपर्कात आहेत आणि आवश्यक ती सर्व मदत पुरविली जात आहे. या वाटचालीत गुजरातची संपूर्णपणे काळजी घेतली जात आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर चरण व्हावी, अशी मी ईश्वरी प्रार्थना करतो.”
गुजरातमधील सुरत जिल्ह्यात महाराष्ट्रातील एसटी बसचा अपघात होऊन काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
एसटी आणि जळगाव जिल्हा प्रशासन सुरत जिल्हा प्रशासनाशी संपर्कात आहेत आणि… — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 2, 2026
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.