Amravati Crime: चॉकलेटचं आमिष दाखवत घरात नेलं अन् चिमुकलीसोबत नको ते कृत्य…; अमरावतीत धक्कादायक घटना

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे चॉकलेटचे आमिष दाखवून एका चिमुकलीला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
Amravati Crime: चॉकलेटचं आमिष दाखवत घरात नेलं अन् चिमुकलीसोबत नको ते कृत्य…; अमरावतीत धक्कादायक घटना

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे चॉकलेटचे आमिष दाखवून एका चिमुकलीला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. 12 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. खेळत असलेल्या चिमुकलीला आरोपी रामकृष्ण पंजाबराव राठोड याने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले आणि तिला आपल्या घरात नेल्याचा आरोप आहे. घरात नेल्यानंतर आरोपीने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, चिमुकलीने आरडाओरड केल्याने तिच्या भावाला संशय आला. तो तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने प्रकार उघडकीस आला. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधत आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

या प्रकरणी दर्यापूर पोलिसांनी 14 ऑगस्ट रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने पोक्सो कायद्यासह संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत १५ ऑगस्टच्या पहाटे आरोपीला अटक केली. घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून, अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दर्यापूर पोलीस करत असून, घटनेमागील सर्व बाबींची चौकशी केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version