गाडी पार्क करण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून अज्ञात तरुणांनी 33 वर्षीय तरुणाच्या अंगावर क्रेटा कार दोनदा रिव्हर्स चालवून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना नेरुळमधील मिनीमहल हॉटेलसमोर घडली आहे. या घटनेतील फरार चौकडीने यावेळी दोघा तरुणावर हॉकी स्टिकने हल्ला करून पलायन केले असून नेरूळ पोलिसांनी या चौकडीचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील तक्रारदार आशुतोष मोरजकर आशुतोष व त्याचा मित्र मुबिन हे दोघे शिरवणे येथील मिनीमहल हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यावेळी मुबिन याने हॉटेल समोर पार्क केलेल्या दुचाकीला क्रेटा कार मधील तरुण लाथ मारत होते. याचा जाब विचारायला आशुतोष आणि मुबीन गेले असता जोरदार भांडण सुरु झाले.
या दरम्यान मध्यस्थी करत भांडण मिटविण्यासाठी गेलेल्या रणजितसिंग शेरगिल याच्या अंगावरचं क्रेटा कार घालत त्याची हत्या केलेय. यानंतर आरोपी पसार झाले मात्र काही वेळाने पुन्हा येत आशुतोष वर हल्ला चढवला आणि पुन्हा फरार झाले. याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.