Accident News: दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर अग्नितांडव! 8 जणांचा होरपळून मृत्यू; आग कशामुळे भडकली? डिकीत सापडलेल्या ‘त्या’ वस्तूने खळबळ

राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला आहे. बुधवारी मध्यरात्री दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर एका खासगी बस आणि ट्रकची भीषण धडक झाली.
Accident News: दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर अग्नितांडव! 8 जणांचा होरपळून मृत्यू; आग कशामुळे भडकली? डिकीत सापडलेल्या ‘त्या’ वस्तूने खळबळ

राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला आहे. बुधवारी मध्यरात्री दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर एका खासगी बस आणि ट्रकची भीषण धडक झाली. या अपघातात तब्बल 8 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावरील कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे 2:30 च्या सुमारास बसने ट्रकला मागून जोरात धडक दिली.

ही धडक इतकी जोरदार होती की, यात दोन्ही वाहने जळून खाक झाली. ही बस ऋषिकेशहून इंदूरच्या दिशेने जात होती. यात 8 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे, तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने दौसा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आतापर्यंत जखमींमधील 9 जणांची ओळख पटली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

हेही वाचा- Pune Crime: एकामागोमाग 8 वाहनांना धडक, रस्त्यावर उडाला गोंधळ! हडपसरमध्ये अल्पवयीन चालकावर नागरिकांचा संताप

यावेळी अपघातादरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका रहिवाशाने मोठा खुलासा केला आहे. ज्यावेळेस हा रहिवासी घटनास्थळी पोहचला त्यावेळेस त्याला डिकीमध्ये सिगारेटचे पाकीट भरलेले दिसले. त्यांनी केलेल्या या खुलास्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर पोलिसांना हा अपघात स्लिपर ड्रायव्हरला डुलकी लागल्याने झाल्याचा संशय आहे.

दरम्यान अपघात होताच ग्रामस्थांनी पहाटे माहिती देऊनसुद्धा रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची वाहने तब्बल एक तास उशिराने पोहोचली. ज्यामुळे प्रवाशांना बसमध्येच अडकून राहावे लागले. वेळेत मदत न मिळाल्यामुळे काहींचा आगीतच होरपळून मृत्यू झाला तर जखमींना वेळीच उपचार मिळाले नाही. त्यामुळे या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version