नेपाळ: कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेलेल्या मुंबईतील सुमारे 60 पर्यटकांबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. नेपाळ-चीन सीमेजवळील कस्टम आणि इमिग्रेशन इमारती परिसरात मोठ्या प्रमाणावर दरड, चिखल आणि मातीचा ढिगारा कोसळल्याने हे पर्यटक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रतिकूल परिस्थितीमुळे घटनास्थळी पोहोचणे अत्यंत कठीण झाल्याने बचावकार्यालाही मोठा फटका बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार, अंधेरीतील डॉ. मिलिंद चितळे यांच्या हिल अँड ट्रॅकिंग कंपनीमार्फत हा पर्यटकांचा गट कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेला होता. रविवारी सकाळी सुमारे साडेआठच्या सुमारास हा गट सीमावर्ती कस्टम आणि इमिग्रेशन इमारतीजवळ पोहोचला असताना अचानक डोंगराचा मोठा भाग कोसळल्याची माहिती मिळत आहे.
40 ते 50 फूट ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
दुर्घटनेनंतर इमारतीवर मोठ्या प्रमाणात माती, चिखल आणि दगडांचा मारा झाल्याने संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला. या ढिगाऱ्याखाली पर्यटक 40 ते 50 फूट खोलीपर्यंत दबले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, प्रत्यक्ष परिस्थितीची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नसून अधिकृत बचाव पथकांकडून शोधकार्य सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Specialised team from India for Tunnel Search & Rescue operation worked with the Nepali Army’s team at hydropower tunnel sites in Chilime and Langtang area today. The team will continue to conduct search and rescue operations in close coordination with the Nepali Army
?????… pic.twitter.com/H7UcIoNxN4 — Naveen Srivastava, Ambassador of India in Nepal (@navsri6619) August 30, 2026
बचावकार्यापुढे मोठे आव्हान
नेपाळ सरकारसमोर सध्या सर्वात मोठे आव्हान म्हणजे घटनास्थळी पोहोचण्याचा मार्गच बंद झाला आहे. दुर्घटनेनंतर सुमारे 90 किलोमीटरचा रस्ता चिखल, माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गेला असल्याने बचाव पथकांना तेथे पोहोचणे अशक्यप्राय झाले आहे.स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, त्या भागात केवळ हेलिकॉप्टरच्या मदतीनेच शोधमोहीम राबवता येऊ शकते. मात्र, ढिगाऱ्याचे प्रमाण इतके मोठे आहे की यंत्रसामग्रीने तो तातडीने हटवणे शक्य होत नसल्याचे सांगितले जात आहे.
कुटुंबीयांना प्रतीक्षा करण्याचे आवाहन
या दुर्घटनेची माहिती संबंधित पर्यटकांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. नेपाळ सरकारने भारतीय दूतावासाच्या माध्यमातून कुटुंबीयांना काही दिवस संयम राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच भारतातील स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये पर्यटक बेपत्ता असल्याची नोंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे मुंबईतील संबंधित कुटुंबीयांवर चिंतेचे सावट पसरले असून, सर्वांचे लक्ष आता नेपाळमधील बचाव आणि शोधमोहीमेच्या पुढील घडामोडींवर लागले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.