Donald Trump: 34 वर्षांचा दुरावा संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; इस्रायल आणि लेबनानमध्ये उद्या होणार थेट चर्चा

या चर्चेमुळे युद्धविराम आणि शांतता प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी हिजबुल्लाहने या चर्चांपासून स्वतःला दूर ठेवले आहे.
Donald Trump: 34 वर्षांचा दुरावा संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; इस्रायल आणि लेबनानमध्ये उद्या होणार थेट चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि लेबनानमध्ये 34 वर्षांनंतर प्रथमच थेट चर्चा होणार असल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट करत म्हटले की, “इस्रायल आणि लेबनानमध्ये थोडी मोकळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांनी जवळपास 34 वर्षांपासून एकमेकांशी चर्चा केलेली नाही. आता ही चर्चा उद्या होणार आहे. ही चांगली गोष्ट आहे.”

या घोषणेमुळे इस्रायल आणि लेबनानदरम्यान युद्धविराम होण्याची शक्यता पुन्हा वाढली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून इस्रायली सैन्य लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या तळांवर हल्ले करत आहे, तर हिजबुल्लाहकडूनही इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांची घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा: Mumbai Water Cut : अल-निनोचा फटका! मान्सूनवर परिणाम; 1 मेपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपातीची शक्यता

दरम्यान, वॉशिंग्टनमध्ये नुकतीच इस्रायल आणि लेबनानच्या राजदूतांमध्ये थेट चर्चा झाली होती. तीन दशकांहून अधिक काळानंतर झालेल्या या चर्चेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी मध्यस्थी केली होती. दोन्ही देशांमध्ये पुढील वाटाघाटी सुरू ठेवण्याबाबत सहमती झाली आहे.

तथापि, हिजबुल्लाहने या चर्चांवर नाराजी व्यक्त केली असून, शस्त्रसंधी किंवा कोणत्याही कराराचा भाग नसल्याचे स्पष्ट केले आहे.

लेबनानमधील अनेक नेत्यांनी तातडीच्या युद्धविरामाची मागणी केली असली, तरी इस्रायलने हिजबुल्लाहविरोधातील कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत दिले आहेत. 

हेही वाचा: Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषदेचे रणशिंग फुंकले! 9 जागांसाठी मोर्चेबांधणीला वेग; मविआची कसोटी, तर महायुतीचा वरचष्मा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version