भिवंडीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोशनबाग परिसरात 17 शाळकरी विद्यार्थ्यांना एकाच रिक्षामध्ये कोंबून वाहतूक केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. क्षमतेपेक्षा कित्येक पटीने जास्त विद्यार्थ्यांना कोंबून हा जीवघेणा प्रवास सुरू होता.या प्रकारामुळे सर्व 17 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला असून, या बेजबाबदार वाहतुकीवर वाहतूक पोलीस प्रशासन कारवाई करणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शाळकरी मुलांच्या अशा धोकादायक वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.