राज्यातील शाळा येत्या सोमवारपासून सुरू करण्यात यावा, असा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवला आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाने याबाबत निर्णय घेण्यात यावा, असेही या प्रस्तावात शालेय विभागाने म्हटले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
राज्यात पुन्हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता राज्य सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळा येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. दरम्यान, आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पुन्हा शाळा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे ठेवला आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘पालक आणि समाजमाध्यमाद्वारे सर्व स्तरावरून शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आम्ही स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी असेल तेथील आयुक्तांना शाळा सुरू करण्याचे अधिकार देण्यात यावे आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात यावा. त्यानुसार शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.’
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.