मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतो. क्रिकेट विश्वातील घडामोडींवर तो नेहमी आपली प्रतिक्रिया देत असतो. त्यामुळेच तो नेहमी चर्चेत असतो. आता तर एका वेगळ्याच कारणामुळे तो चर्चेत आला आहे. भारत आणि जपान यांच्यात मंगळवारी झालेल्या सामन्यानंतर सचिनने केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
सचिनच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे?
भारत-जपान सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी जपान क्रिकेट बोर्डाने एक भारी आयडिया राबवली होती. नवीन प्रेक्षकांना क्रिकेटचे नियम सहज समजावेत म्हणून त्यांनी खास पोस्टर्सची सोय केली होती. हीच गोष्ट सचिनच्या नजरेतून सुटली नाही. त्याने याच उपक्रमाचं भरभरून कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
There’s something very special about watching cricket find new homes. Seeing India play Japan is wonderful in itself, but what made me smile was seeing reckoners being given to the audience at the entrance so they could understand the game better. We’ve all had our first… pic.twitter.com/1d79UxIziG — Sachin Tendulkar (@sachin_rt) September 22, 2026
सचिनने लिहिलंय, “क्रिकेटला एक नवीन घर मिळतंय हे पाहून खूप छान वाटतं. भारत-जपान मॅच जबरदस्त झाली. पण मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे, स्टेडियममध्ये आलेल्या चाहत्यांना खेळ समजावा म्हणून जपानने दिलेले ते खास पोस्टर्स. आपण सगळ्यांनी क्रिकेट पाहिलंय, पण आता नवे चाहते हा अनुभव घेतायत हे पाहून खरंच आनंद झाला. जपानच्या टीमने आव्हान स्वीकारून छान लढत दिली.” सध्या सचिनची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जपान क्रिकेटने दिलेल्या त्या मार्गदर्शक पोस्टरमध्ये क्रिकेटच्या बेसिक गोष्टी अगदी सोप्या भाषेत समजावल्या होत्या. जसं की – फलंदाज कसा आऊट होतो?, रन कसे मोजतात?, मैदानाची रचना कशी असते?, अंपायरचा इशारा काय सांगतो? आणि स्कोअरबोर्ड कसा वाचायचा? या सगळ्या गोष्टींचा त्यात समावेश होता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.