PM Kisan Update: बोगस लाभार्थ्यांना केंद्र सरकारचा मोठा फटका; आता ‘हा’ पुरावा दाखवल्याशिवाय PM Kisanचा हप्ता मिळणार नाही

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
PM Kisan Update: बोगस लाभार्थ्यांना केंद्र सरकारचा मोठा फटका; आता ‘हा’ पुरावा दाखवल्याशिवाय PM Kisanचा हप्ता मिळणार नाही

PM Kisan Update:पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत केंद्र सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, देशभरातील शेतकऱ्यांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. आतापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी आणि आधार व्हेरिफिकेशन आवश्यक होते. मात्र आता सरकारने ‘फार्मर आयडी’ अनिवार्य करत नवा नियम लागू केला आहे. यामुळे योजना अधिक पारदर्शक होणार असून, बनावट लाभार्थ्यांवर मोठी कारवाई होणार आहे.

सरकारचे पाऊल नेमके काय?

गेल्या काही वर्षांत पीएम किसान योजनेचा लाभ लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असताना काही ठिकाणी गंभीर गैरप्रकार आढळले. चुकीची नोंदणी, चुकीची कागदपत्रे, बँक खात्यातील त्रुटी आणि बोगस लाभार्थी यामुळे सरकारचे मोठे नुकसान होत होते. काही प्रकरणांत तर शेतकरी नसलेली माणसेही योजनेचा हप्ता घेत असल्याचे समोर आले. त्यामुळे या त्रुटी दूर करण्यासाठी ‘फार्मर आयडी’ हा मुख्य उपाय म्हणून सरकारने पुढे आणला आहे.

फार्मर आयडी म्हणजे काय आणि कसा उपयोग होणार?

फार्मर आयडी म्हणजे शेतकऱ्याची एक डिजिटल ओळख. यात शेतकऱ्याचे नाव, भूधारणा, पीक पद्धती, बँक माहिती, आधार क्रमांक आणि त्याने घेतलेल्या शासकीय योजनांची तपशीलवार नोंद असेल.

हेही वाचा: Aadhar Card Photocopy Ban: आधार कार्डचे आता नवीन नियम! हॉटेल्स आणि इव्हेंटमध्ये आधार पडताळणीची पद्धत बदलली, जाणून घ्या

सरकार 'एक शेतकरी – एक आयडी' या संकल्पनेवर काम करत असून, त्यामुळे खालील फायदे होतील:

  • शेतकऱ्याचा संपूर्ण डेटा एका ठिकाणी उपलब्ध राहील

  • चुकीच्या नोंदी किंवा बनावट लाभार्थी ओळखणे सोपे होईल

  • पीक विमा, पीक कर्ज, खत अनुदान, पीएम किसान यासह अनेक योजना एका आयडीने जोडल्या जातील

  • राज्य आणि केंद्र सरकार धोरणे आखताना अचूक डेटा वापरू शकतील

  • शेतकऱ्यांना योजना मिळवण्याच्या प्रक्रियेत कमी कागदपत्रे लागतील

PM किसान योजनेच्या हप्त्यावर कसा परिणाम?

सरकारने स्पष्ट करत सांगितले आहे की, नवीन ‘फार्मर आयडी’ नोंदविल्याशिवाय आगामी हप्ते बँक खात्यात जमा होणार नाहीत. म्हणजेच ज्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना लवकरात लवकर आयडी बनवावी लागेल.

आतापर्यंत या योजनेतून देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हप्ते जमा झाले असून, 22 व्या हप्त्यापूर्वी ही नवीन अट लागू होत आहे.

हेही वाचा: RBI : 'आता फायदा लोकांना होऊदे…', आरबीआयच्या सार्वजनिक आणि खासगी बँकांना निर्देश

शेतकऱ्यांचे त्रास कमी होणार

योजनेत वारंवार आढळणाऱ्या खालील समस्यांना आता पूर्णविराम मिळेल:

  • चुकीचा बँक खाते क्रमांक

  • अपूर्ण कागदपत्रे

  • चुकीची नोंदणी

  • गावनिहाय अपात्र लाभार्थी

  • योजना मिळण्यासाठी होणारी पळापळ

सरकार आता सर्व कृषी योजना पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणत असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त एकच आयडी पुरेसा ठरेल.

डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे मिळणारे फायदे

फार्मर आयडी लागू झाल्यानंतर शेतकरी थेट डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडला जाईल. त्याला त्याच्या नावावर कोणत्या योजना चालू आहेत, किती अनुदान मिळाले आहे, विमा किती मिळाला, पीक कर्जाची स्थिती काय आहे याची माहिती एका क्लिकवर समजू शकेल. त्यामुळे त्याची फसवणूक होणार नाही आणि कोणतीही रक्कम चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात जाण्याचा धोका कमी होईल.

पीएम किसान योजनेत ‘फार्मर आयडी’ अनिवार्य केल्याने केंद्र सरकारने बोगस लाभार्थ्यांवर मोठा प्रहार केला आहे. यामुळे योजनेची विश्वसनीयता वाढणार असून, खर्‍या शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल. आगामी दिवसांत ही आयडी इतर कृषी योजनांसाठीही मुख्य आधार ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version