स्वतःच लोक मारतात आणि पाकवर आरोप करतात; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला

जम्मू-काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. भारत सरकार सतत पाकिस्तानवर करत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबद्दल बोलताना माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी काय म्हणाले? जाणून घेऊया
स्वतःच लोक मारतात आणि पाकवर आरोप करतात; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला

पाकिस्तान: जम्मू-काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या घटनेला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान संतापला आहे. त्यासोबतच, परिस्थितीचे गांभीर्य पाहता केंद्र सरकारने भारतात उपस्थित असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी जाण्याचे आदेश दिले आहेत आणि केंद्र सरकारने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करारही रद्द केला आहे. अशातच, भारत सरकार सतत पाकिस्तानवर करत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबद्दल बोलताना माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी काय म्हणाले? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: पुणेकरांसाठी खुशखबर; पुणे विमानतळावर दहा रुपयात चहा आणि वीस रुपयात कॉफी

शाहिद आफ्रिदी पुन्हा संतापला

एका पाकिस्तानी वाहिनीसोबत बोलताना माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाले की, 'भारतात काहीही झाले की त्याचा सगळा दोष पाकिस्तानवर येतो. काश्मीरमध्ये 8 लाख भारतीय लष्करी जवान तैनात आहेत. मात्र, तरीही तिथे हल्ला झाला आहे. यावरून हे सिद्ध होतं की तुम्ही किती नालायक आहात. भारतीय लष्कर कोहीही सुरक्षा देऊ शकत नाही'. 

पुढे, या दहशतवादी हल्ल्याच्या कव्हरेजबाबत ते म्हणाले, 'आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हल्ल्याच्या एका तासाच्या आत भारताचा मीडिया बॉलीवूड झाला. मला धक्का बसला. ज्या प्रकारच्या गोष्टी ते बोलत होते, मी खूप मजा घेत होतो. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय प्रत्येक टीव्ही चॅनेल खुलेआमपणे पाकिस्तानवर आरोप करत होते'. पुढे, माजी भारतीय खेळाडूंची नावे न घेता माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी म्हणाले की, 'टीम इंडियासाठी ज्या दोन क्रिकेटपटूंनी इतके क्रिकेट खेळले आहे, आणि चांगले क्रिकेटपटू राहिले आहेत, ते आता थेट पाकिस्तानवर आरोप करत आहेत. पण पाकिस्तानलाच का तुम्ही नावे ठेवत आहात? तुम्ही पुरावे दाखवा'. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version