नवी दिल्ली: 9 सप्टेंबर 2025 पासून आशिया कप 2025 सुरू झाला आहे. रविवारी झालेल्या आशिया कप 2025 च्या सुपर 4 सामन्यात भारताने बाजी मारत पाकिस्तान संघाला पराभूत केलं. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर पार पडला. अशातच, क्रिक्रेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी क्रिक्रेटपटू हारिस रऊफची पत्नी मुझना मसूद मलिकने तिच्या सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली. यामुळे क्रिक्रेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात हारिस रौफ वारंवार भारतीय फलंदाजांना भडकवण्याचा प्रयत्न करत होता. सोबतच, दुसऱ्या डावात जेव्हा भारतीय संघ फलंदाजी करत असताना एख व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ मैदानात फलंदाजी करताना आणि मैदानातील प्रेक्षकांना आपल्या हातांनी विमान पाडण्याची कृती दाखवताना दिसत आहे. या घटनेनंतर, सीमारेषेवर विकेटकिपिंग करणाऱ्या हारिस रौफला स्टेडियममधील भारतीय क्रिक्रेटप्रेमींनी लगेच त्याला त्याची जागा दाखवली. क्रिक्रेटप्रेमींनी ‘कोहली… कोहली’ अशी घोषणाबाजी करत हारिस रौफला भारताचा स्टार क्रिक्रेटर विराट कोहलीची आठवण करून दिली. त्यामुळे, हारिस रौफ आणखी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
अशातच, या वादात आता हारिस रऊफची पत्नी मुझना मसूदने एंट्री केली. यादरम्यान, मुझना मसूदने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली की, ‘आम्ही सामना हरलो, पण आम्ही युद्ध जिंकलो’. विशेष म्हणजे, दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आशिया कप 2025 चा सुपर 4 सामना पार पडला. या सामन्याच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान संघ दुसऱ्यांदा एकमेकांसमोर आले. या सामन्यात नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, भारतीय संघातील क्रिक्रेटपटूंनी दमदार पद्धतीने खेळत पाकिस्तानला 6 विकेटने पराभूत केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.