आयपीएल 2026 च्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झालेला सामना केवळ निकालामुळेच नाही, तर मैदानावर घडलेल्या खास क्षणांमुळेही चर्चेत आला आहे. या लढतीत बंगळुरुने 18 धावांनी मुंबईचा पराभव करत महत्त्वाचा विजय मिळवला. मात्र, सामन्यादरम्यान रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील मजेशीर प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधले.
बंगळुरुच्या डावात विराट कोहलीने संयमी फलंदाजी करत 38 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या खेळीमुळे संघाला मजबूत धावसंख्या उभारता आली. दुसरीकडे, मुंबईकडून रोहित शर्मा चांगल्या लयीत दिसत होता, मात्र स्नायू दुखापतीमुळे त्याला सहाव्या षटकातच मैदान सोडावे लागले. त्याने 13 चेंडूत 19 धावा केल्या होत्या.
सामन्यादरम्यान घडलेला एक खास क्षण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बंगळुरुची फलंदाजी सुरू असताना विराट कोहली आणि त्याचा साथीदार स्ट्राइकवर होते. एका चेंडूवर फटका खेळल्यानंतर चेंडू थेट रोहित शर्माकडे गेला. त्या वेळी कोहली एक धाव घेण्याच्या तयारीत होता.
रोहितने चेंडू पटकन उचलत स्टंपकडे रोख धरला आणि कोहलीकडे पाहत जणू काही रनआऊट करण्याची ‘धमकी’ दिल्यासारखा इशारा केला. हा प्रसंग अगदी क्षणिक असला, तरी त्यात दोघांमधील मैत्रीपूर्ण स्पर्धा आणि मैदानावरील केमिस्ट्री स्पष्ट दिसून आली. कोहलीनेही त्यावर हलक्याफुलक्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली.
Back to winning ways ? A statement victory for #RCB at the Wankhede as they defeat #MI by 1️⃣8️⃣ runs ❤️ Scorecard ▶️ https://t.co/q1MGJfD2d8#TATAIPL | #KhelBindaas | #MIvRCB | @RCBTweets pic.twitter.com/n2RaM9oZyk — IndianPremierLeague (@IPL) April 12, 2026
याआधीही कोहली फलंदाजीसाठी मैदानात येताना रोहित शर्माशी संवाद साधताना दिसला. दोघांमध्ये काही क्षण चर्चा झाल्याचेही पाहायला मिळाले. या दोन्ही स्टार खेळाडूंमधील समन्वय आणि आपुलकी चाहत्यांना नेहमीच भावते, आणि या सामन्यातही त्याचा प्रत्यय आला.
दरम्यान, सामन्याच्या निकालाबद्दल बोलायचे झाल्यास, बंगळुरुच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये प्रभावी कामगिरी करत मुंबईचा डाव आवरला. त्यामुळे मुंबईला लक्ष्य गाठता आले नाही आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
या सामन्यानंतर सोशल मीडियावर रोहित आणि विराट यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. चाहत्यांकडून या क्षणावर विविध प्रतिक्रिया येत असून, ‘रो-को’ची ही जुगलबंदी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. क्रिकेटप्रेमींना मैदानावरचा असा हलकाफुलका आणि मैत्रीपूर्ण क्षण पाहायला मिळणे हीच खरी मजा असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.