Ishan Kishan Retires Hurt In Duleep Trophy Final: सध्या सुरु असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या सामान्यांनी क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. रजत पाटीदार, मोहम्मद शमी, मुकेश कुमार, यश राठोड, वैभव सूर्यवंशी आपल्या दमदार खेळीने प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. याबरोबरीचं नाव म्हणजे ईशान किशन, चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ईस्ट झोनचा कर्णधार ईशान किशनने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. साऊथ झोनच्या गोलंदाजांची धुलाई करत ईशानने तब्बल 270 धावांची खेळी केली.
विशेष म्हणजे, त्याने ही धावसंख्या केवळ 301 चेंडूंमध्ये 30 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने गाठली. मात्र, 270 धावांचा टप्पा गाठल्यानंतर ईशान किशन रिटायर्ड हर्ट झाला आणि त्याला मैदान सोडावं लागलं. त्याने बॅट उंचावत चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले. पण काही वेळातच ईशान किशन रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. म्हणजेच तो विकेट गमावून बाद झालेला नाही, तर फलंदाजी करत असताना मैदान सोडण्याची वेळ त्याच्यावर आली. महत्त्वाचं म्हणजे, कोणती दुखापत झाली किंवा मैदान सोडण्यामागचं वैद्यकीय कारण काय होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
सय्यद मुश्ताक अली करंडक पासून त्याने क्रिकेट विश्वात कम बॅक केला. तसेच, IPL 2025 मध्ये सनराइझ हैद्राबादला एलिमिनेशनच्या टप्प्यापर्यंत पोहोचवण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. संपूर्ण हंगामात त्याने सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. याआधी ईशान किशनने भारतासाठी 2 कसोटी सामने खेळले असून, त्याने शेवटचा सामना जुलै 2023 मध्ये खेळला आहे. त्याच्या या दमदार खेळीमुळे त्याला भारतीय कसोटी संघात सामील करून घेतील का, हे पाहण्याजोगे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.