Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy News : 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा धमाका! अवघ्या 8 धावांनी शतक हुकलं, पण ‘तो’ जुना विक्रम मोडला; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

भारताचा युवा आणि स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी याने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये धमाका केल्यानंतर आता डोमेस्टिकमध्ये पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवत इतिहास रचला आहे.
Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy News : 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा धमाका! अवघ्या 8 धावांनी शतक हुकलं, पण ‘तो’ जुना विक्रम मोडला; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

भारताचा युवा आणि स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आपल्या तोडफोड फटकेबाजीने नवा रेकॉर्ड नावावर केला आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये धमाका केल्यानंतर आता डोमेस्टिकमध्ये पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवत त्याने इतिहास रचला आहे. ईस्ट झोन आणि सेंट्रल झोन यांच्यात सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वैभवने अवघ्या 42 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकत मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

वैभवच्या या तुफानी अर्धशतकामुळे दुलीप ट्रॉफीच्या विक्रमांच्या पुस्तकात मोठी नोंद झाली आहे. तब्बल 57 वर्षांपासून अबाधित असलेला हा विक्रम वैभवने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर मोडून काढला आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने संयमी सुरूवात करत सेंट्रल झोनच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

हेही वाचा- IND vs THA Womens Asia Cup 2026 : सलामीच्या फलंदाजांची दाणादाण; मात्र डाव सांभाळत भारताचा थायलंडवर 94 धावांनी दणदणीत विजय

पहिल्या इनिंगमध्ये 113 च्या स्ट्राईक रेटने त्याने 81 बॉलवर 7 फोर अन् 7 सिक्स मारले आणि 92 धावांची खेळी केली. 50 बॉलमध्ये 52 धावांचा आकडा पूर्ण केल्यानंतर 90 पर्यंत पोहचलेल्या वैभवने शतकासाठी स्पीड कमी न करता आक्रमक भूमिका घेतली. ज्यामुळे 92 धावांवर सिक्स मारण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली.  दुलीप ट्रॉफीमध्ये अर्धशतक करणारा वैभव या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला.

याआधी लक्ष्मण सिंह यांनी 1969 मध्ये 16 वर्षे 23 दिवसांच्या वयात दुलीप ट्रॉफीत अर्धशतक झळकावले होते.  त्यानंतर वैभव सूर्यवंशीने वयाच्या 15 वर्षे आणि 157 दिवसांनी अर्धशतक झळकावून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अवघ्या 15 वर्षांच्या वैभवने दुलीप ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला. हे वैभवच्या फर्स्ट-क्लास कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक ठरले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version