पोलीस कोठडीतून चोरटा कसा पळाला?, पाहा हा व्हिडिओ

पोलीस कोठडीतून चोरटा कसा पळाला?, पाहा हा व्हिडिओ

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चाकण पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार घडला असून घरफोडी आणि चोऱ्या करणाऱ्या अटकेतील चोरट्याने चक्क लॉकअप मधून पळ ठोकलाय. तो लॉकअप मधून कसा बाहेर आला, याचे प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. आरोपी फरार झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल बाळू वीर असे आरोपीचे नाव आहे. सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास सगळे पोलीस त्यांच्या कामात दंग होते. तर पोलीस ठाण्यातील अंमलदार हे लघुशंकेला बाहेर आले होते. त्याचवेळी शरीराने सडपातळ असलेला कुणाल लॉकअपच्या दोन्ही गजांमधून बाहेर पडला आणि काही कळायच्या आत त्याने धूम ठोकली परंतु चाकण पोलिसांनी काहीवेळातच सापळा रचून त्याला पुन्हा अटक केली.

पाहा हा व्हिडिओ :

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version